बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:21 IST2026-05-07T14:19:24+5:302026-05-07T14:21:37+5:30

कोट्यवधींच्या मावेजा घोटाळ्याचा तपास जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत; महसूल विभागात खळबळ.

Beed National Highway land acquisition scam: Then District Collector Avinash Pathak Detained | बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात

बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात

बीड/लातूर: बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपातील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास आता थेट जिल्ह्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. एसआयटीने (SIT) दिवसभर केलेल्या कसून चौकशीनंतर ही कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या जमीन संपादनावेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मावेजात आणि जमिनीच्या मूल्यांकनात प्रचंड फेरफार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यात पाठक यांच्या नावाचाही समावेश होता.

तपास पथकाचा धडाका
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्याकडे होता. मात्र, सध्या हा तपास एम. व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. पोलिसांनी ठोस पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केली असून, पाठक यांना ताब्यात घेतल्याने आता या घोटाळ्यातील इतर बड्या माशांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : बीड राजमार्ग भूमि घोटाला: पूर्व कलेक्टर पाठक भ्रष्टाचार मामले में गिरफ्तार

Web Summary : बीड राजमार्ग भूमि अधिग्रहण घोटाले में पूर्व कलेक्टर अविनाश पाठक गिरफ्तार। किसानों को मुआवजा और भूमि मूल्यांकन में हेराफेरी का आरोप। एसआईटी जांच में पाठक की संलिप्तता उजागर, लातूर आवास से गिरफ्तार।

Web Title : Beed Highway Land Scam: Ex-Collector Pathak Arrested in Corruption Case

Web Summary : Ex-Collector Avinash Pathak arrested in Beed highway land acquisition scam. Allegations involve misappropriation of funds during land valuation and compensation to farmers. SIT investigation revealed Pathak's involvement, leading to his arrest from Latur residence.