१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:35 IST2026-05-07T14:32:23+5:302026-05-07T14:35:37+5:30
Agni-VI News: गतवर्षी ७ मे ते १० मे या काळात चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय क्षेपणास्त्रांनी आपली ताकद दाखवून दिली होती. आता भारताकडून संरक्षण क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकण्यात येत आहे. भारताने १० हजार किमीहून अधिक लांबीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) अग्नी-६ ची चाचणी करण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता या क्षेणपास्त्राची चाचणी करण्यासाठी केवळ सरकारच्या परवानगीची वाट पाहिली जात आहे.

गतवर्षी ७ मे ते १० मे या काळात चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय क्षेपणास्त्रांनी आपली ताकद दाखवून दिली होती. आता भारताकडून संरक्षण क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकण्यात येत आहे. भारताने १० हजार किमीहून अधिक लांबीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) अग्नी-६ ची चाचणी करण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता या क्षेणपास्त्राची चाचणी करण्यासाठी केवळ सरकारच्या परवानगीची वाट पाहिली जात आहे.


अग्नी-६ क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही १० हजार किमी पेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र एमआयआरव्ही तंत्रज्ञानाने सज्ज असेल. एमआयआरव्हीचा अर्थ मल्टिपल इंडिपेडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल असा होतो. या एकाच क्षेपणास्त्राने अनेक न्यूक्लियर वॉरहेड वेगवेगळ्या लक्ष्यांपर्यंत डागल्या जातात. त्यामुळे शत्रूच्या मिसाईल डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊ शकते.

सध्या जगात केवळ अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनजवळ आयसीबीएमची पूर्ण क्षमता आहे. अग्नी-६ ची चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारताचाही हे तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या एलिट क्लबमध्ये समावेश होईल.

दरम्यान, केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपानेही अग्नी-६ क्षेपणास्त्राबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. भारत हा महाशक्ती बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. १० हजार किमी मारक क्षमता आणि एमआयआरव्ही तंत्रज्ञानासह अग्नी-६ इतिहास रचणार आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या सुरक्षेला अजेय बनवेल. तसेच भारताला जगातील शक्तिशाली देशांच्या रांगेत नेऊन ठेवेल.

















