मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:07 IST2026-05-07T13:07:20+5:302026-05-07T13:07:52+5:30

Epstein Files News: काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या एपस्टीन फाईल्समुळे अमेरिकेसोबत  जगभरात खळबळ उडाली होती. यादरम्यान, आताया प्रकरणाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला आहे. 

Epstein Files: What did Jeffrey Epstein write before his death? Who is mentioned, letter surfaced 7 years later | मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र

मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र

काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या एपस्टीन फाईल्समुळे अमेरिकेसोबत  जगभरात खळबळ उडाली होती. एपस्टीनच्या फाईल्समध्ये अनेक बडे  नेते, उद्योगपती आणि प्रतिष्ठितांच्या काळ्या कारनाम्यांचा उल्लेख होता. त्यामुळे या फाईल्सवरून मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप रंगले होते. या फाईल्समध्ये असं काही आहे जे लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान, या प्रकरणाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला आहे. 

जेफ्री एपस्टीन याने त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेलं एक कथित पत्र समोर आलं आहे. तसेच हे पत्र या प्रकरणातील एक  महत्त्वपूर्ण पुरावा मानलं जात आहे. तसेच ते आता प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे पत्र अनेक वर्षांपासून न्यूयॉर्कमधील एका न्यायालयातील फाईलमध्ये सिलबंद होते. हे पत्र बुधवारी न्यायमूर्ती केनेथ  एम.  करास यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले. हे पत्र पिवळ्या रंगाच्या लीगल पॅड पेपरवर लिहिलेलं होतं. तसेच हे पत्र एपस्टीन याचा तुरुंगातील सोबती असलेल्या निकोलस  टार्टेंग्लियोन याने शोधले होते. 

या पत्राच्या सुरुवातीला एपस्टिन याने त्याच्याविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याने पत्रात लिहिले की, त्यांनी अनेक महिने तपास  केला. मात्र त्यांना या तपासामधून काही सापडलं नाही. तसेच या जगाचा निरोप घेण्याची वेळ स्वत:लाच निवडता येणे हा एक वेगळाच अनुभव  आहे, असेही त्याने लिहिले.

याशिवाय एपस्टिनने या पत्रात  जीवन आणि मृत्यूबाबत बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. त्यावेळी एपस्टिनच्या मनात काय  सुरू होतं, याचा अंदाज या पत्रामधून येतो. हे पत्र  मे २०२१ मध्ये न्यायालयाकडे सोपवण्यात आले होते. मात्र कायदेशीर वादविवादामुळे हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. एवढंच नाही तर अमेरिकेच्या न्याय विभागालाही या पत्राबाबत कल्पना नव्हती. 

Web Title : एपस्टीन की मौत से पहले का पत्र 7 साल बाद सामने आया: मुख्य बातें।

Web Summary : जेफ्री एपस्टीन की मौत से पहले का पत्र, जो सालों से सीलबंद था, अब जारी किया गया है। इसमें जांच के प्रति उसकी निराशा और जीवन-मृत्यु पर विचार शामिल हैं। उसके सेलमेट द्वारा खोजा गया पत्र 2021 में अदालत में पेश किया गया था।

Web Title : Epstein's suicide note revealed after 7 years: Key details inside.

Web Summary : Jeffrey Epstein's suicide note, sealed for years, has been released. It reveals his frustration with the investigation and reflections on life and death. The letter, found by his cellmate, was submitted to court in 2021.