बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:37 IST2026-05-07T13:37:11+5:302026-05-07T13:37:44+5:30
Jay Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी आजपासून बारामती येथे जनता दरबाराची सुरुवात केली आहे. जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवानेते जय अजितदादा पवार यांनी आजपासून बारामती येथे जनता दरबाराची सुरुवात केली आहे. जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
जनतेच्या अडचणी, समस्या जाणून घेत जय पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
बारामतीतील जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय अजितदादा पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत.