देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सांगली : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मंगळवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने जल्लोष करण्यात आला. ... ...
राजस्थान, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले असून, सावंतवाडीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तर सावंतवाडीप्रमाणे कणकवली शहरातही कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ...
राजस्थानमधील 2008 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त एका मताने पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सीपी जोशी यांना यंदाच्या निवडणुकीत मोठा दिलासा मिळाला. नाथद्वारा मतदारसंघातून डॉ.सीपी जोशी यांनी विजय मिळविला आहे. ...
मिझोरमचे मुख्यमंत्री असलेल्या लाल थनहवला यांना दोन्ही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंफाई साऊथ आणि सेरछिप या दोन्ही मतदार संघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...