देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Assembly Elections 2018 : आगामी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये देशात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है, असे अशोक चव्हाण म्हणाले. ...
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला. ...
तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये टीआरएससमोर पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसनं ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ...