देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे मंगळवारी करण्यात आला. येथील मुस्लिम लायब्ररी चौक आणि गांधी चौकात अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभेत काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह ... ...
पाच राज्यांच्या निकालात भाजपाची वाताहत होऊन काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे. या निकालाचा जल्लोष यवतमाळ शहरातील दत्त चौकासह जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला. ...
पाच राज्यात भाजपाची वाताहत होण्यामागे शेतकरी, व्यापारी व समाजातील अन्य घटकांची भाजपावर असलेली नाराजी हे प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. ...
Assembly Election 2018 Results : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला. ...