देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Madhya Pradesh political Crisis: काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
सत्तेच्या सारीपाटात लोकशाही जनमताची घोर प्रतारणा. चलाख राजकारण्यांनी पक्षांतरबंदी कायदा निरर्थक बनवून टाकला आहे. विधिमंडळ पक्षातील दोन तृतीयांशाहून कमी आमदारांनी पक्ष सोडला तर हा कायदा लागू होतो व त्यांची आमदारकी रद्द होते. इथे २२ आमदारांनी स्वत:हून ...
संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजप राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. ...
मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. प्रथेनुसार अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर लगेच सरकारने बहुमत सिद्ध करावे असे अधिकृत पत्र राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढकेली. ...