टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 00:07 IST2026-04-30T00:05:34+5:302026-04-30T00:07:37+5:30

West Bengal Exit Poll 2026 : पश्चिम बंगालमधून ममता सरकार जाणार आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता स्थापन करणार, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर एक्झिट पोलनुसर जाणून घेऊयात, या निवडणुकीत महिलांची सर्वाधिक मते कोणत्या पक्षाच्या बाजूने गेली आणि पुरुषांची सर्वाधिक कोणत्या पक्षाच्या बाजूने गेली? 

TMC or BJP Who is the first choice of women and men in West Bengal These figures will change the math of power | टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार

टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार

BJP vs TMC Voter Percentage : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज थांबली. आज येथे दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यापूर्वी, २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात १५२ जागांवर मतदान झाले होते. लोक उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडले आणि त्यांनी विक्रमी मतदान केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या टप्प्यात ९२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी विविध एक्झिट पोलही समोर आले आहेत. पश्चिम बंगालमधून ममता सरकार जाणार आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता स्थापन करणार, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर एक्झिट पोलनुसर जाणून घेऊयात, या निवडणुकीत महिलांची सर्वाधिक मते कोणत्या पक्षाच्या बाजूने गेली आणि पुरुषांची सर्वाधिक कोणत्या पक्षाच्या बाजूने गेली? 

महिला कल कोणाच्या बाजूने? -
'मॅट्रिझ'च्या (MATRIZE) एक्झिट पोलनुसार, महिला आणि पुरुष मतदारांच्या पसंतीत मोठी तफावत दिसून आली आहे. पश्चिम बंगालमधील २९४ जागांवर महिला मतदारांचा कल आजही तृणमूल काँग्रेसच्या बाजूने अधिक दिसून आला. तृणमूलला ४४% महिलांची मते मिळण्याचा अंदाज असून भाजपला ४१% मते मिळू शकतात. तर इतर पक्षांना १५ टक्के महिला मतदान होताना दिसत आहे. अर्थात महिला मतदारांचा विचार करता, दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत दिसते.

पुरुषांचा कल कोणाच्या बाजूने? -
दुसऱ्या बाजूला, मॅट्रिझ'च्या (MATRIZE) एक्झिट पोलनुसार, पुरुष मतदारांचा कल स्पष्टपणे भाजपकडे झुकलेला दिसत आहे. भाजपला ४४% पुरुषांनी पसंती देत मतदान केल्याचा अंदाज आहे. तर तृणमूलला ४०% पुरुष मते मिळाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, १६% पुरुषांची इतर पक्षांना साथ दिल्याची शक्यता आहे.

बंगालमध्ये सत्तांतर होणार? -
एकूण निकालाचा विचार करता, एक्झिट पोलने बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार येण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला १४६ ते १६१ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला १२५ ते १४० जागांवर समाधान मानावे लागू शकते. याशिवाय, इतर पक्षांना ६ ते १० जागा मिळू शकतात. मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता, भाजप ४२.५ टक्क्यांसह आघाडीवर असून शकतो, तर तृणमूलला ४०.८ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

 

Web Title : बंगाल चुनाव: टीएमसी या बीजेपी? महिलाओं, पुरुषों की पसंद बदलेगी सत्ता।

Web Summary : पश्चिम बंगाल एग्जिट पोल में कांटे की टक्कर। महिलाएं टीएमसी (44%) को बीजेपी (41%) से ज्यादा पसंद करती हैं, जबकि पुरुष बीजेपी (44%) को टीएमसी (40%) से ज्यादा पसंद करते हैं। बीजेपी को 146-161 सीटें जीतने का अनुमान है, जिससे सरकार बन सकती है।

Web Title : Bengal Election: TMC or BJP? Women, men's preference will change power.

Web Summary : West Bengal exit polls show a close contest. Women favor TMC (44%) over BJP (41%), while men prefer BJP (44%) over TMC (40%). BJP is predicted to win 146-161 seats, potentially forming the government.