नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 00:29 IST2026-04-30T00:27:43+5:302026-04-30T00:29:27+5:30

दोसरभवन चौकाजवळील डेटोनेटर्स ठेवल्याचा तथाकथित ‘डीएसएस’ संघटनेचा दावा...

Threat of radiation in Nagpur Threat of radioactive material being thrown at RSS headquarters-memorial temple, anonymous letter to Police Commissioner | नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र

नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल येथील मुख्यालय तसेच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे करण्यात आला आहे. संबंधित पत्र नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पाठविण्यात आले होते. ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेने हे पत्र पाठविले असून त्यात संघाबाबत आक्षेपार्ह भाषेचादेखील प्रयोग करण्यात आला आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली असून ‘एटीएस’नेदेखील सर्व ठिकाणी सखोल तपासणी सुरू केली आहे.

२७ एप्रिल रोजी पोस्टाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त कार्यालयात संबंधित निनावी पत्र आले. इंग्रजी भाषेतील संबंधित पत्र ‘डीएसएस’ नावाच्या संघटनेने पाठविल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर, मेट्रो या ठिकाणी ‘सिझीयम-१३७’ ही ‘रेडिओॲक्टिव्ह’ पावडर टाकल्याचे लिहिण्यात आले होते. संबंधित पावडर ही प्रचंड विनाशकारी असून त्यामुळे अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी ऑरेंज आणि ॲक्वा लाइनवरील मेट्रो गाड्यां तसेच भाजप-संघ कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या आपली बसमध्येदेखील ‘सिझीयम-१३७’ ही पावडर टाकल्याचा दावा केला. आम्ही मेट्रोच्या सीट्सवर पावडर टाकली आहे असे त्यात नमूद आहे. आम्हाला कॅन्सर इस्पितळातून ही पावडर मिळाली. संपूर्ण नागपूरच आता ‘रेडिएशन’च्या धोक्यात असून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील तज्ज्ञांकडून तपासणी केल्यावर यातील सत्यता तुम्हाला लक्षात येईल, असेदेखील आरोपींनी लिहिले आहे.

खोडसाळपणा की जाणूनबुजून दिलेली धमकी?
या पत्रामुळे खळबळ उडाली. तातडीने एटीएसचे पथकदेखील पोहोचले. पत्रात नमूद केलेल्या संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर, भाजपचे गणेशपेठ येथील कार्यालय, मेट्रो स्थानक इत्यादी जागांवर जाऊन एटीएसच्या पथकाने एनडीआरएफ व अणुऊर्जातज्ज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी केली. मात्र, कुठेही काहीही आढळले नाही. या प्रकरणात एटीएसच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कुणीतरी केलेला खोडसाळपणा आहे की जाणूनबुजून दिलेली धमकी आहे याचा तपास सुरू आहे.

स्फोटके ठेवल्याचा दावा, आता तर खरा खेळ सुरू -
काही दिवसांअगोदर दोरसभवन मेट्रो स्थानकाच्या मागील डॉ. उज्ज्वल लांजेवार यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतून डेटोनेटर्स व जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. ही स्फोटकेदेखील आम्हीच ठेवली होती व हा केवळ इशारा आहे. खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title : नागपुर: आरएसएस मुख्यालय को रेडियोधर्मी खतरे की धमकी; गुमनाम पत्र से जांच शुरू।

Web Summary : एक गुमनाम पत्र में नागपुर को विकिरण से खतरा बताया गया, जिसमें दावा किया गया कि आरएसएस मुख्यालय और अन्य स्थानों पर रेडियोधर्मी सामग्री लगाई गई है। पुलिस और एटीएस ने जांच की, कुछ नहीं मिला। पहले विस्फोटक मिलने का भी दावा किया गया था।

Web Title : Nagpur: Radioactive threat to RSS HQ; Anonymous letter sparks investigation.

Web Summary : An anonymous letter threatened Nagpur with radiation, claiming radioactive material was planted at RSS headquarters and other locations. Police and ATS investigated, finding nothing. A prior explosives discovery was also claimed.