IPL २०२६ च्या मोहिमेची सुरुवात दिमाखदार विजयासह केल्यावर मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवरुन घसरली आहे. १३ वर्षांनी IPL हंगामातील पहिला सामना जिंकल्यावर पाच वेळच्या IPL चॅम्पियनवर सलग चार पराभवाची नामुष्की ओढावली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह त्यांनी पुन्हा ट्रॅकवर येण्याचे संकेत दिले. पण त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने आणि आता सनरायझर्स हैदराबादच्या संघाने वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजूनही MI ची प्लेऑफ्सची आस कायम
यंदाच्या हंगामातील ८ सामन्यानंतर हार्दिक पांड्याची MI पलटन २ विजय आणि ६ पराभवासह ४ गुणांसह गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहे. सध्याची परिस्थितीत पाहता प्लेऑफ्सच्या शर्यतीत त्यांचा निभाव लागणं मुश्किल आहे, असे चित्र निर्माण झाले असले तरी अजूनही त्यांची स्वबळावर अव्वल चारमध्ये पोहचण्याची आशा जिवंत आहे. जाणून घेऊयात MI साठी कसं असेल प्लेऑफ्सचं समीकरण
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
कसं आहे मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफ्सचं समीकरण?
सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून राहणं कठीण झाले आहे. पण अजूनही ते स्वबळावर आघाडीच्या चारमध्ये एन्ट्री मारू शकतात. पण यासाठी त्यांना उर्वरित सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागतील. ६ पैकी ६ सामने जिंकून मुंबई इंडियन्सचा संघ १४ लढतीनंतर १६ गुणांपर्यंत पोहचू शकतो. प्लेऑफ्ससाठी ही मॅजिक फिगर आहे.
एक सामना गमावला तर काय?
जर मुंबई इंडियन्सच्या संघाने उर्वरित सामन्यांपैकी एक सामना गमावला तर स्वबळावर या शर्यतीतून ते बाहेर पडतील. या परिस्थितीत इतर संघाची कामगिरी आणि जर तर च्या समीकरणात टिकून राहण्यासाठी नेट रनरेटचा फॅक्टरही महत्त्वपूर्ण ठरेल. यात आणखी एका पराभवाची भर पडली तर मात्र मुंबई इंडियन्सचा प्रवास हा साखळी फेरीतीच संपुष्टात येईल.