देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवल्याने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले आणि आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेल असं राहुल यांनी म्हटलं आहे. ...
मोदी म्हणाले, शेतकऱ्यांनी स्वतंत्र व्हावे, अशी कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांची इच्छा नाही. शेतकरी ज्याची पूजा करतो त्याच गोष्टींना विरोधकांकडून आग लावली जात आहे. ...
आता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेसने या विधेयकाला विरोध सुरु केला आहे. यावरून शेतकऱ्यांचे भले होऊ नये अशीच काँग्रेस- राष्ट्रवादीची इच्छा आहे असा आरोप भाजपाने केला आहे. ...
सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. ...