Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:50 IST2026-05-06T14:48:38+5:302026-05-06T14:50:39+5:30

Viral News: मुलानं दिलेलं गिफ्ट पाहून आई-वडील भावून झाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Son Promises Scooter, Gifts Parents Luxury BMW; Heartwarming Video Goes Viral | Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!

Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!

आई-वडील आपल्या मुलांच्या स्वप्नांसाठी आयुष्यभर झटतात, पोटाला चिमटा काढून त्यांना शिकवतात. आपल्या मुलाने आयुष्यात मोठे व्हावे आणि यशाचे शिखर गाठावे, हीच प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते. जेव्हा हेच यश मुलगा संपादन करतो आणि आपल्या पहिल्या कमाईतून पालकांसाठी काहीतरी खास करतो, तो क्षण शब्दांत मांडता येत नाही. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण आपल्या आई-वडिलांना घराबाहेर घेऊन येतो. त्याने पालकांना आधी सांगितले होते की, त्याने घरासाठी एक नवीन 'स्कूटर' खरेदी केली आहे. स्कूटर पाहण्याच्या उत्साहात आई-वडील घराबाहेर येतात. मात्र, समोरचे दृश्य पाहून त्यांचे स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.


'कंटेंट क्रिएटर' सिद्धार्थ भदौरिया यांनी आपल्या आईला वडिलांसाठी स्कूटर खरेदी करणार आहे, असे सांगितले. त्यावेळी त्याच्या आईने त्याला सावध केले की, अशा मोठ्या खर्चाने कदाचित वडील नाराज होतील. स्कूटरवर १ ते १.५० लाख रुपये खर्च करणे वडिलांना आवडणार नाही, असे आई म्हणाली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिद्धार्थ आपल्या आई-वडिलांना पार्किंगच्या जागेत घेऊन गेला आणि त्याने वडिलांच्या हातात चावी दिली. वडिलांनी चावीवरील बटण दाबले असता त्यांच्या अगदी समोर उभी असलेल्या बीएमडब्लू एक्स १ कारचे दिवे चमकले. सुरुवातीला ते विचारात पडतात. परंतु, काही वेळाने त्यांना समजते की, त्यांच्या मुलाने मुलाने स्कूटर नव्हे तर, चक्क बीएमडब्लू कार खरेदी केली आहे. या व्हिडीओत सिद्धार्थचे वडील त्याला इतकी महागडी कार खरेदी का केली? असे विचारतात. त्यावर सिद्धार्थ हसतो आणि म्हणतो की, किंमतीचा विचार सोड, फक्त प्रवासाचा आनंद घ्या. कारच्या आत बसल्यानंतर आई म्हणते की, "मला अजूनही विश्वास बसत नाही की, मी या कारमध्ये बसले आहे. हे स्वप्न तर नाही ना?"

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थने लिहिले आहे, "त्यांनी मला सर्व काही दिले; आता माझ्यावर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आहे." या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली. एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, "केवळ स्कूटर घेण्याच्या कल्पनेनेच ते इतके आनंदी झाले होते, त्यांच्यासाठी आपल्या मुलाचा आनंदच सर्वात महत्त्वाचा आहे." दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, "हा व्हिडिओ पाहताना माझ्या डोळ्यांत पाणी आले."

Web Title : बेटे ने स्कूटर की जगह BMW गिफ्ट कर माता-पिता को चौंका दिया।

Web Summary : बेटे ने माता-पिता को स्कूटर की जगह BMW उपहार में देकर चौंका दिया। माता-पिता बेटे के उदार उपहार पर विश्वास नहीं कर पा रहे थे, जो उनके बलिदानों के प्रति आभार का प्रतीक था।

Web Title : Son's surprise BMW gift shocks parents who expected a scooter.

Web Summary : A son surprised his parents with a BMW, after telling them he bought a scooter. Overjoyed, the parents couldn't believe their son's generous gift, a token of gratitude for their sacrifices.