Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 14:41 IST2026-05-06T14:16:20+5:302026-05-06T14:41:29+5:30

Trisha Krishnan : तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री असल्याने तृषा मोठं मानधन घेतं. विशेषतः 'पोन्नियिन सेल्वन'च्या यशानंतर तिच्या मानधनात वाढ झाली आहे.

अभिनेत्री तृषा कृष्णन गेल्या काही आठवड्यांपासून सतत चर्चेत आहे. विशेषतः सूर्यासोबतच्या 'करुप्पु' चित्रपटातील तिच्या लूकची झलक समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. याशिवाय तिच्या पर्सनल आयुष्याबद्दलही विविध चर्चांना उधाण आले आहे.

अभिनेता थलापती विजय आणि तिच्यामध्ये खास मैत्री असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनीही या नात्यावर किंवा मैत्रीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ४ मे रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयने घवघवीत यश मिळवलं, तेव्हाही तृषा चर्चेत होती.

'ई-टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, तृषा कृष्णनची एकूण संपत्ती सुमारे ८५ कोटी आहे. तिने आपलं पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य अत्यंत मेहनतीने उभं केलं असून ती तिच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखली जाते.

तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री असल्याने तृषा मोठं मानधन घेतं. विशेषतः 'पोन्नियिन सेल्वन'च्या यशानंतर तिच्या मानधनात वाढ झाली आहे.

'जीक्यू इंडिया'च्या मते, 'लिओ' चित्रपटासाठी तिला सुमारे ५ कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनल कामांतून ती वर्षाला ९ कोटी रुपये कमावते.

तृषाकडे चेन्नईमध्ये एक अत्यंत आलिशान घर आहे, ज्याची किंमत साधारण १० ते १२ कोटी रुपये आहे. तसेच हैदराबादमध्येही तिची एक मालमत्ता असून तिची किंमत ६ ते ७ कोटींच्या घरात असल्याचं मानलं जातं.

तृषा कृष्णनला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. तिच्या ताफ्यात मर्सिडीज-बेंज S-Class, BMW 5 Series, Range Rover Evoque आणि मर्सिडीज-बेंज E-Class यांसारख्या प्रीमियम कारचा समावेश आहे.

तृषा अलीकडेच कमल हासन आणि सिलंबरसन टीआर यांच्यासोबत 'ठग लाईफ' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. मणी रत्नम यांचं दिग्दर्शन असलेल्या या गँगस्टर ॲक्शन ड्रामामध्ये ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज आणि महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

आर. जे. बालाजी दिग्दर्शित 'करुप्पु' या चित्रपटात सूर्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा एक फँटसी ॲक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट १४ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.