देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाविकास आघाडीत कधी तात्त्विक मुद्द्यांवर तर कधी निधी वाटपावरून तर कधी धोरणात्मक मुद्द्यांवर बरेचदा खटके उडाले पण सरकारच्या स्थैर्यावर त्याचा विपरित परिणाम झालेला नाही. ...
शिवसेनेच्या सगळ्या महत्त्वकांक्षा मुख्यमंत्रिपदाभोवती केंद्रित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तर सत्ता कशी राबवायची याचा वस्तुपाठ आहे आणि काँग्रेसचे नेते तर आपण खरेच सत्तेत आहोत का, हे राेज सकाळी स्वत:ला चिमटा काढून तपासत असावेत. ...
Mumbai Congress president : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांना उमेदवारी देतांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची काँग्रेस हायकमांडने उचलबांगडी केली होती. ...
husain dalwai : प्रत्यक्षात मोदी स्वतः ही घटनेचे पावित्र्य राखतात असे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसलेले नाही. त्यामुळे मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असा टोला दलवाई यांनी लगावला. ...
दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती. ...