नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:04 IST2026-05-08T16:57:02+5:302026-05-08T17:04:41+5:30

Nida Khan Police Custody Nashik TCS Case: निदा खानला २५ दिवस पोलिसांपासून लपण्यात मतिन पटेलने मदत केल्याचा आरोप

Nashik TCS case Nida Khan remanded in police custody till May 11 AIMIM corporator Matin Patel also booked | नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा

नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा

Nida Khan Police Custody Nashik TCS Case: नाशिक शहरातील चर्चेत असणारे TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी २५ दिवसांनंतर अटक केली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. तिला गुरूवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर आज तिला कोर्टात हजर केले असता, तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छ. संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल (Matin Patel) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या काही दिवसांपासून कॅसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहत होती. विशेष म्हणजे तिच्यासोबत तिचे ४ नातेवाईकही फ्लॅटमध्ये सोबत राहायचे. पोलिसांना तिच्या लोकेशन बदलाची माहिती वेळोवेळी मिळायची परंतु प्रत्येक वेळी तपास यंत्रणेच्या तावडीतून वाचण्यात तिला यश येत होते. अखेर नाशिक क्राइम ब्रांच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. रात्री ११.३० वाजता पोलिसांच्या टीमने तिला अटक केली. या अटकेनंतर सर्वात आधी तिची मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यानंतर ट्रांजिट वॉरंट प्रक्रियेत तिला संभाजीनगर कोर्टासमोर हजर केले. आता तिला नाशिकला घेऊन जात आहेत. जिथे तिला नाशिकच्या कोर्टासमोर हजर केले जाईल.

२५ मार्चपासून निदा खान होती फरार

नाशिकमधील TCS प्रकरण समोर आल्यापासून पोलीस निदा खानच्या शोधात होती. २५ मार्चपासून ती सातत्याने फरार होती. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तिचा शोध सुरू ठेवला होता. आरोपी निदा खान वारंवार तिचे लोकेशन बदलत होती. जवळच्या नातेवाईकांनी तिला लपवण्यात मदत केली होती. त्यातच अंतरिम जामिनासाठी तिने प्रयत्न सुरू केला होता. परंतु कोर्टाने तिला दिलासा दिला नाही. २ मे २०२६ रोजी नाशिक कोर्टाने तिची याचिका फेटाळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोध मोहिमेला आणखी वेग दिला.

Web Title : नाशिक टीसीएस मामला: निदा खान हिरासत में; एआईएमआईएम पार्षद पर मामला

Web Summary : नाशिक टीसीएस धर्मांतरण मामले की मुख्य आरोपी निदा खान 25 दिनों बाद गिरफ्तार। एआईएमआईएम पार्षद मतीन पटेल पर मदद करने का मामला दर्ज। 11 मई तक पुलिस हिरासत में।

Web Title : Nashik TCS Case: Nida Khan in Custody; AIMIM Corporator Booked

Web Summary : Nida Khan, key accused in Nashik TCS conversion case, arrested after 25 days. AIMIM corporator Matin Patel booked for aiding her. She's in police custody until May 11.