ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:50 IST2026-05-08T14:49:32+5:302026-05-08T14:50:38+5:30

Suvendu Adhikari CM West Bengal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार येणार. गृह मंत्रालय स्वतःकडे ठेवणार, रूपा गांगुलींकडे उपमुख्यमंत्रीपद. वाचा सविस्तर अपडेट.

CM West Bengal: The beginning of the Suvendu Adhikari era in Bengal as the Chief Minister; North Bengal will get the post of Deputy Chief Minister along with Roopa Ganguly | ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल झाला असून, राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सुवेंदु अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुवेंदु अधिकारी केवळ मुख्यमंत्रीच होणार नाहीत, तर महत्त्वाचे असे गृह मंत्रालय देखील स्वतःकडे ठेवणार आहेत. यासोबतच राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील, ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि नेत्या रूपा गांगुली यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे. 

मंत्रिमंडळात समतोल राखण्यासाठी भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला निवडला आहे. रूपा गांगुली यांच्यासोबतच दुसरा उपमुख्यमंत्री उत्तर बंगालमधील (दार्जिलिंग परिसर) पुरुष लोकप्रतिनिधी असेल. आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर या निर्णयांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.  दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सुवेंदु यांचा करिश्मा
सुवेंदु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव केला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्यांनी नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जींना हरवले होते, आता सलग दुसऱ्यांदा त्यांनी हा पराक्रम गाजवला आहे.

शपथविधीची जय्यत तयारी
कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे अडथळे आले असले तरी सर्व व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रातील दिग्गज मंत्री कोलकाता येथे दाखल होत आहेत.

अमित शाह कोलकात्यात दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांचे कोलकात्यात आगमन झाले. विमानतळावरून ते थेट नोवोटेल हॉटेल येथे पोहोचले. त्यांच्यासोबत सुवेंदु अधिकारी, दिलीप घोष आणि समिक भट्टाचार्य हे भाजपचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. बंगालमधील सत्तास्थापनेच्या ऐतिहासिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा दौरा अत्यंत निर्णायक मानला जात आहे.

Web Title : सुवेंदु अधिकारी होंगे पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री; रूपा गांगुली उपमुख्यमंत्री

Web Summary : सुवेंदु अधिकारी पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री बने, गृह मंत्रालय भी संभालेंगे। रूपा गांगुली उपमुख्यमंत्री होंगी। उत्तरी बंगाल से एक और उपमुख्यमंत्री मंत्रिमंडल को संतुलित करेंगे। ममता बनर्जी पर अधिकारी की जीत के बाद घोषणा। कोलकाता में शपथ ग्रहण समारोह की तैयारी।

Web Title : Suvendu Adhikari to be West Bengal CM; Rupa Ganguly Deputy CM

Web Summary : Suvendu Adhikari named West Bengal's CM, also holding Home Ministry. Rupa Ganguly is Deputy CM. Another Deputy CM from North Bengal will balance the cabinet. The announcement follows Adhikari's victory over Mamata Banerjee. Oath ceremony preparations underway in Kolkata.