स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 15:27 IST2026-05-08T15:25:55+5:302026-05-08T15:27:05+5:30
स्वप्न शास्त्र: अनेक शुभ स्वप्नं आपल्याला भविष्याचे संकेत देतात, मात्र आपण ते सगळ्यांना सांगून मोकळे होतो तसे केल्यास नशिबाची साथ मिळत नाही!

स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका
झोपेत पडणारी स्वप्नं म्हणजे केवळ मेंदूचे खेळ नसून 'स्वप्न शास्त्रानुसार' (Swapna Shastra) ते भविष्याचे संकेत असतात. काही स्वप्नं खूप छान असतात, तर काही भीतीदायक. पण तुम्हाला माहीत आहे का? काही स्वप्नं अशीआहेत जी चुकूनही कुणाला सांगू नये. जर तुम्ही ती इतरांना सांगितली, तर त्यांचा शुभ प्रभाव कमी होतो किंवा त्याचे फळ मिळत नाही.
हे ही वाचा : Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
स्वप्नांच्या दुनियेत प्रत्येक दृश्याचा एक अर्थ असतो. काही स्वप्ने इतकी शुभ असतात की ती तुम्हाला लवकरच श्रीमंत किंवा यशस्वी बनवू शकतात. पण अशी स्वप्ने 'गुपित' ठेवणेच फायद्याचे ठरते. ती स्वप्नं कोणती ते पाहू.
१. देवी-देवतांचे दर्शन
जर तुम्हाला स्वप्नात ईश्वर, एखादे मंदिर किंवा दैवी प्रकाश दिसला असेल, तर ते अत्यंत भाग्याचे लक्षण आहे. असे स्वप्न दर्शवते की तुमच्या आयुष्यातील अडथळे लवकरच दूर होणार आहेत. पण हे स्वप्न इतरांना सांगितल्याने त्यातील 'सात्विक ऊर्जा' कमी होते आणि त्याचे फळ मिळण्यास उशीर होतो.
हे ही वाचा : Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
२. स्वतःचा किंवा दुसऱ्याचा मृत्यू पाहणे
असे स्वप्न पाहिल्यावर आपण घाबरतो, पण स्वप्न शास्त्रानुसार हे शुभ लक्षण आहे. मृत्यूचे स्वप्न म्हणजे त्या व्यक्तीचे संकट टळले आहे आणि तिचे आयुष्य वाढणार आहे. हे स्वप्न कुणाला सांगितल्याने त्यातील 'अरिष्ट' निवारण्याची शक्ती क्षीण होऊ शकते.
३. निसर्ग, बागा किंवा कमळाचे फूल
स्वप्नात हिरवीगार बाग, पाऊस किंवा कमळाचे फूल दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत. हे स्वप्न तुमच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक आहे. ते गुप्त ठेवल्यास धनलाभ होण्याची शक्यता जास्त असते.
हे ही वाचा : Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
४. मासे किंवा पाण्याचे पात्र
स्वप्नात मासे दिसणे हे खूप शुभ मानले जाते. मासे हे समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहेत. जर तुम्ही हे स्वप्न कोणाला सांगितले, तर तुमच्या कामात नजर लागण्याची किंवा अडथळे येण्याची शक्यता असते.
५. माता-पित्यांचे दर्शन किंवा आशीर्वाद
जर तुम्हाला स्वप्नात तुमचे आई-वडील हसतमुख चेहऱ्याने आशीर्वाद देताना दिसले, तर समजा तुमचे नशीब उजळणार आहे. हे स्वप्न तुमच्या सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे, जो तुमच्यापुरताच मर्यादित ठेवणे श्रेयस्कर ठरते.