पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:49 IST2026-05-08T14:49:37+5:302026-05-08T14:49:52+5:30
या प्रक्रियेसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर बिप्लव कुमार देव सह-निरीक्षक आहेत.

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
पश्चिम बंगालमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर, आता सत्तास्थापनेच्या हालचालींनाही वेग आला आहे. पश्चिम बंगालचा भाजपचा पहिला मुख्यमत्री कोण होणार? याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर बिप्लव कुमार देव सह-निरीक्षक आहेत.
अमित शाह शुक्रवारी कोलकात्यात दाखल झाले आहेत. यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील भाजपचे फायरब्रँड नेते शुभेंदू अधिकारी, प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य आणि दिलीप घोष आदी दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी, अमित शाह यांनी, ज्या पद्धतीने शुभेंदू अधिकारी यांची पाठ थोपटली, त्यांच्या या एका कृतीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, तेथे इतरही नेते उपस्थित होते. मात्र, ही विशेष दाद केवळ शुभेंदू अधिकारी यांनाच मिळाली आणि हाच मुख्यमत्रीपदासाठी त्यांच्या नावाला हिरवा कंदील मानला जात आहे.
दुसरा संकेत, अमित शाह विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. ते विमानतळावरून रवाना होताना थेट शुभेंदु अधिकारी यांच्याच गाडीत बसून गेल्याने, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अधिकारी यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
Extended a Hearty Welcome to the Hon'ble Union Home Minister Shri @AmitShah Ji on his arrival at the Netaji Subhash Chandra Bose International Airport at Kolkata.
— Suvendu Adhikari (@SuvenduWB) May 8, 2026
This is the first time 'The Modern Day Chanakya' is visiting the Pious Land of West Bengal following the resounding… pic.twitter.com/HEoz1ZNFbP
आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सभागृह नेत्याची निवड केली जाईल. याच बरोबर बंगालच्या भावी मुख्यमंत्र्यांचे नावही स्पष्ट होईल. बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत असल्याने, विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी पक्ष कुणाच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवणार, याचे चित्र आज स्पष्ट होईल.