राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:07 IST2026-05-08T16:05:20+5:302026-05-08T16:07:06+5:30

Thalapathy Vijay CM Tamil Nadu Majority: तामिळनाडू सत्तासंघर्ष संपला! विजय यांच्या TVK ला CPI, CPM आणि VCK कडून पाठिंबा. ११८ आमदारांसह विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. वाचा सविस्तर.

Thalapathy Vijay CM Tamil Nadu Majority: The Governor Arlekar asked for 118, Vijay gathered 118...! The majority mark was reached, the dilemma of a hung assembly was resolved in Tamilnadu | राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला

राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला

सत्तास्थापनेसाठी दोन वेळा जाऊनही राज्यपालांनी थलापती विजयला ११८ आमदारांच्या सह्या आणण्यास सांगत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेण्यास नकार दिला होता. यातच डीएमके आणि एआयडीएमकेने युती करत सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरु केल्या होत्या. दोन एकमेकांचे विरोधी पक्ष सत्तेत कसे येणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच विजयने बहुमताचा आकडा जुळविला आहे.  

तामिळनाडूच्या राजकारणातील सस्पेन्स अखेर संपला आहे. अभिनेता विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कळघम' पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळाले असून, विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वामपंथी पक्ष (CPI, CPM) आणि विदुथलाई चिरुथैगल काची (VCK) यांनी विजयला पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने तामिळनाडूच्या सत्तेची गणिते आता स्पष्ट झाली आहेत.

बहुमताचे गणित: ११८ चा आकडा कसा गाठला?
तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. विजय यांच्याकडे आता एकूण ११९ आमदारांचे संख्याबळ झाले आहे:

 

पक्षजागा
तमिलगा वेत्री कळघम (TVK)१०७*
इंडियन नॅशनल काँग्रेस (INC)०५
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI)०२
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)०२
विदुथलाई चिरुथैगल काची (VCK)०२
एकूण संख्याबळ११९

राजकीय हालचालींना वेग
पट्टिनपक्कम येथील विजय यांच्या निवासस्थानी आधारव अर्जुन यांनी भेट घेतली असून, तिथेच पाठिंब्याबाबतची अंतिम चर्चा झाल्याचे समजते. CPI च्या कार्यकारिणी बैठकीत आणि CPM च्या राज्य समितीच्या बैठकीत TVK ला समर्थन देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सायंकाळी ४:३० वाजता सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, त्यात औपचारिक घोषणा केली जाईल.

त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
तामिळनाडूमध्ये त्रिशंकू विधानसभेची स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' आणि फोडाफोडीच्या राजकारणाची भीती होती. मात्र, विजय यांनी मित्रपक्षांना सोबत घेत स्थिर सरकार देण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

Web Title : विजय को बहुमत मिला: तमिलनाडु में राजनीतिक गतिरोध समाप्त, नई सरकार

Web Summary : अभिनेता विजय की पार्टी, तमिलगा वेत्री कड़गम (टीवीके) को सीपीआई, सीपीएम और वीसीके के समर्थन से बहुमत मिला। विजय को पहले सरकार बनाने का मौका नहीं मिला था। 119 सीटों के साथ, गठबंधन तमिलनाडु में एक स्थिर सरकार बनाएगा, जिससे विधानसभा की अनिश्चितता समाप्त हो जाएगी।

Web Title : Vijay Secures Majority: Tamil Nadu Political Impasse Resolved, New Government Formed

Web Summary : Actor Vijay's party, Tamilga Vetri Kazhagam (TVK), secured a majority with support from CPI, CPM, and VCK. Vijay was earlier denied the chance to form a government. With 119 seats, the coalition will form a stable government in Tamil Nadu, ending the assembly's uncertainty.