Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 06:06 IST2026-05-08T06:03:12+5:302026-05-08T06:06:35+5:30

एप्रिलमध्ये नाशिकस्थित विश्वास को-ऑपरेटीव्ह बँकेतील खरातचे खाते ईडीने सील केले होते. त्यावेळी खरातशी निगडीत नाशिक, पुणे, शिर्डी येथे छापे टाकण्यात आले होते.

Ashok Kharat ED Action Bhondubaba's scam exposed! A mountain of gold was found in Ashok Kharat's locker; ED seized jewellery worth 3 crores | Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त

Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त

Marathi News : मुंबई : भोंदू अशोक खरात याला ईडीने दणका देत त्याच्या बँक लॉकरमधील १ कोटी १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ५ लाख १९ हजार रुपये मूल्याचे परकीय चलन आणि १ कोटी ८९ लाख रुपयांचे चांदीचे दागिने जप्त केले. खरात याच्या मुलीच्या उपस्थितीत ही कारवाई झाली.

एप्रिलमध्ये नाशिकस्थित विश्वास को-ऑपरेटीव्ह बँकेतील खरातचे खाते ईडीने सील केले होते. त्यावेळी खरातशी निगडीत नाशिक, पुणे, शिर्डी येथे छापे टाकण्यात आले होते. त्यात त्याच्या बँक खात्यातील २ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यात ४२ लाख रुपयांच्या रोकडचाही समावेश होता. याचसोबत एकूण ९० मालमत्तांची कागदपत्रे देखील जप्त केली होती.

मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार

९० मालमत्तांवर टाच

भोंदू खरातच्या घरीदेखील कसून तपासणी करण्यात आली. खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांच्या बँक अकाउंटमधील तब्बल दोन कोटी ४० लाखांची रक्कम गोठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच खरातच्या एकूण ९० मालमत्तांवर तात्पुरती टाच आणण्यात आल्याचे सांगितले जाते.

भोंदू खरातवर एकूण १८ गुन्हे दाखल असून, ईडीने आर्थिक फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. ईडीने मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात खरात याच्या विरोधात मनी लाँडरिंग प्रकरणात वॉरंट जारी करण्याची मागणी केली आहे.

Web Title : अशोक खरात की संपत्ति उजागर: ईडी ने सोना, चांदी और नकदी जब्त की

Web Summary : ईडी ने अशोक खरात के लॉकरों पर छापा मारा, जिसमें करोड़ों का सोना, विदेशी मुद्रा और चांदी जब्त की गई। इससे पहले, उनके खाते सील कर दिए गए थे, जिसमें महत्वपूर्ण संपत्ति और 90 संपत्तियां सामने आई थीं। खरात पर मनी लॉन्ड्रिंग सहित 18 आरोप हैं।

Web Title : Ashok Kharat's Wealth Exposed: ED Seizes Gold, Silver, and Cash

Web Summary : ED raided Ashok Kharat's lockers, seizing gold, foreign currency, and silver worth crores. Previously, his accounts were sealed, revealing significant assets and 90 properties. Kharat faces 18 charges, including money laundering.