मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 23:54 IST2026-05-07T23:53:01+5:302026-05-07T23:54:18+5:30
Nashik TCS Nida Khan Arrested: छत्रपती संभाजीनगर येथून निदा खानला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Nashik TCS Nida Khan Arrested:नाशिक TCS कंपनीतील अत्याचार आणि बेकायदा धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अटक करण्यात आली आहे. गेल्या सुमारे २५ दिवसांपासून निदा खान फरार होती. अखेर छत्रपती संभाजीनगर येथून निदा खानला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या TCS प्रकरणातील महिला संशयित निदा खान गेले अनेक दिवस फरार होती. निदा खान हिच्या मागावर नाशिक पोलिसांची दोन पथके होती. तांत्रिक माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेकडून निदा खानला अटक करण्यात आली. पुढील चौकशीसाठी तिला आता नाशिकला नेण्यात आले आहे. नारेगाव कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये निदा खान राहत होती. आई, वडील , भाऊ , मावशी आणि निदा असे ५ जण राहत होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या २५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून पोलीस शोधत होते
नाशिक पोलिसांचे एक विशेष पथक गेल्या २५ दिवसांपासून अधिक काळ निदा खानचा शोध घेत होते. अटक टाळण्यासाठी निदा खानने आपण गर्भवती असल्याचे कारण देत अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. निदा खानवर पीडितेला बुरखा, धार्मिक पुस्तके दिल्याचा आणि तिच्या मोबाइलवर इस्लामी धार्मिक ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल केल्याचा आरोप आहे. तपासात असे उघड झाले आहे की, पीडितेचे नाव बदलून तिला मलेशियाला पाठवले जाणार होते. यामध्ये एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाइलची तपासणी केली असता, SIT च्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. दानिशच्या मोबाईलमध्ये संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ आढळून आले असून, या डिजिटल पुराव्यांचे आता सखोल विश्लेषण केले जात आहे.