IPL 2026 Prince Yadav bamboozles Virat Kohli For A Duck In LSG vs RCB Clash : लखनौच्या मैदानात भारताच्या अनकॅप्ड प्रिन्ससमोर जगात अधिराज्य गाजवणारा किंग कोहली सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात २१३ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि जेकब बेथल जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीनं बेथलच्या रुपात लखनौला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर दुसऱ्या षटकात प्रिन्स यादवनं किंग कोहलीची विकेट घेत मैफील लुटली. जवळपास १४० किमी प्रति तास वेगाने टाकलेल्या चेंडूवर त्याने विराट कोहलीला त्रिफळाचित करत तंबूचा रस्ता धरला. २ चेंडू शून्यावर माघारी धाडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रिन्स यादवनं संघाकडून दुसरे आणि आपले पहिले षटक टाकताना अप्रतिम आउट स्विंग चेंडूसह गोलंदाजीला सुरुवात केली. हा चेंडू विराट कोहलीनं निर्धाव खेळला. दुसऱ्या चंडूवर प्रिन्सनं नवा डाव खेळला. जवळपास १४० कमी प्रति तास वेगाने प्रिन्स यादवनं अचूक टप्प्यावर टाकलेल्या कमालीच्या इनस्विंगवर किंग कोहलीला ऑफ साइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. चेंडू बॅट आणि बॅडच्यामधून थेट यष्टीवर जाऊन आदळला. ही विकेट भारतीय अनकॅप्ड गोलंदाजासाठी अविस्मरणीय अशीच होती. त्याने विकेटचा जो आनंद साजरा केला त्यात ते दिसूनही आले.
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
कोहली झाला आश्चर्यचकित
विराट कोहली यंदाच्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये आहे. पण प्रिन्स यादवने त्याचा दोन चेंडूत खेळ खल्लास केला. प्रिन्सनं कमालीच्या इनस्विंगवर स्टंप उखडल्यावर कोहली खेळपट्टीकडे बघच राहिला. युवा गोलंदाजाने टाकलेला चेंडू कळण्याआधी सगळं घडलं असेच काहीसे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. या विकेटनंतर लखनौच्या स्टेडियमवर एकच शांतता पसरल्याचे पाहायला मिळाले.