विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 05:48 IST2026-05-08T05:47:34+5:302026-05-08T05:48:24+5:30
टीव्हीके नेता विजय दुसऱ्यांदा लाेकभवनावर, राज्यपालांनी बहुमतासाठी समजावला नियम

विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Marathi News : चेन्नई : तमिळनाडू विधानसभेच्या २३४ पैकी १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळ वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते विजय थलपती यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी गुरुवारी दुसऱ्यांदा राज्यपालांची लाेकभवनात भेट घेतली. परंतु, पक्षाकडे आवश्यक बहुमत नसल्याचे सांगून राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना परत पाठवले.
लाेकभवनाच्या निवेदनात म्हटले आहे की, अजूनही टीव्हीकेकडे पुरेसे बहुमत नाही हे राज्यपालांनी विजय यांना समजावून सांगितले. निवडणुकीत २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत अभिनेता विजय यांचा ‘टीव्हीके’ पक्ष १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी या पक्षाला ११८ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लोक भवनबाहेर आंदोलन करत राज्यपाल आर्लेकर यांनी पक्षप्रमुख विजय यांना सरकार स्थापनेस परवानगी द्यावी अशी मागणी केली.
फ्लोअर टेस्ट : राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांच्या समर्थनाची पत्रे सादर करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, बहुमताची चाचणी लाेकभवनात नव्हे तर विधानसभेच्या पटलावरच होणे अनिवार्य आहे. हा दाखला देऊन थलपती विजय सत्तास्थापनेचा दावा करू शकतात.
राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का?
तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तो 'शेवटचा पर्याय' मानला जातो. जर कोणताही पक्ष किंवा युती ११८ या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकली नाही व राज्यात 'घटनात्मक यंत्रणा' अपयशी ठरली, तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात.
आसाममधील नवीन सरकार १२ मे रोजी स्थापन होणार
गुवाहाटी : आसाममध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारचा शपथविधी समारंभ १२ मे रोजी होणार आहे. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहू शकतात.
लाेकशाही मार्ग : भाजपचे प्रवक्ते नारायण तिरुपती यांनी सरकार स्थापनेसाठीची प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही मार्गानेच होईल, असे म्हटले आहे. तर, विजय यांना सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी केंद्र प्रयत्नरत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी केला. लोकशाही परंपरा राखत राज्यपालांनी टीव्हीकेला सरकार स्थापनेसाठी पाचारण करावे, असे आवाहन माकपने केले आहे.
ममता राहिल्या नाहीत बंगालच्या मुख्यमंत्री
पश्चिम बंगालचे राज्यपाल आरएन रवी यांनी गुरुवारी राज्य विधानसभेची मुदत संपल्याचे कारण देत विधानसभा बरखास्त केली. या निर्णयामुळे, पद सोडण्यास नकार दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी या आता राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. लोकभवनकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, तृणमूल सत्तेत असलेल्या राज्य विधानसभेची मुदत ७ मे रोजी संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
चंद्रनाथ रथ हत्येच्या तपासासाठी शोधपथके
कोलकाता : प. बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे सहकारी व स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके स्थापन केली आहेत.