"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 20:48 IST2026-05-08T20:41:45+5:302026-05-08T20:48:07+5:30

पश्चिम बंगालच्या राजकारणा अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारे शुभेंदू अधिकारी, आता राज्याचे नवे 'अधिकारी' होणार आहेत. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले अधिकारी, आज त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक म्हणून समोर आले आहेत.

Now in Bengal Shubhendu Adhikari's first reaction after being elected as the Chief Minister, see what he said... | "आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?

"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?

पश्चिम बंगालच्या राजकारणात आता भाजप पर्वाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (८ मे २०२६) अधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर होताच, शुभेंदू अधिकारी म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आज फळ मिळाले आहे. हा बंगालच्या जनतेचा विजय आहे. तसेच, संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पश्चिम बंगालच्या राजकारणा अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारे शुभेंदू अधिकारी, आता राज्याचे नवे 'अधिकारी' होणार आहेत. कधीकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले अधिकारी, आज त्यांचे सर्वात मोठे राजकीय विरोधक म्हणून समोर आले आहेत.

"भाषणे कमी आणि काम अधिक करण्यावर भर देईन" -
निवडीनंतर कार्यकर्त्यांचे आभार मानताना अधिकारी यांनी, टीएमसीच्या काळात मारल्या गेलेल्या ३२१ भाजप कार्यकर्त्यांचे स्मरण केले. ते म्हणाले, "भाजपने आपल्या जाहीरनाम्यातील जी काही आश्वासने दिली आहेत, ती सर्व पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल. आता बंगालमध्ये कुणालाही घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्याचा गौरव परत आणू. मी भाषणे कमी आणि काम अधिक करण्यावर भर देईन."

कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर

"आता घुसखोरी आणि गो-तस्करी करणे अशक्य होईल" -
यावेळी अमित शाह म्हणाले, "त्रिपुरा आणि आसामनंतर आता बंगालमध्येही भाजपचे सरकार आले आहे. आता घुसखोरी आणि गो-तस्करी करणे अशक्य होईल. आम्ही बंगालच्या सीमा अभेद्य किल्ल्याप्रमाणे बनवू." तसेच, राज्यातील २३ पैकी ९ जिल्ह्यांमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पूर्णपणे 'सूपडा साफ' झाला आहे. हा प्रचंड जनादेश केवळ जनता आणि ईश्वराची कृपा आहे, असेही शाह यांनी म्हटले आहे.

 

 

Web Title : शुभेंदु अधिकारी बने बंगाल के मुख्यमंत्री: चुनाव के बाद पहली प्रतिक्रिया

Web Summary : शुभेंदु अधिकारी बंगाल के नए मुख्यमंत्री बने। उन्होंने संदेशखाली के दोषियों के खिलाफ कार्रवाई, शहीद भाजपा कार्यकर्ताओं को श्रद्धांजलि और घोषणापत्र के वादे पूरे करने का संकल्प लिया। अमित शाह ने घुसपैठ और गौ तस्करी रोकने और बंगाल की सीमाएं सुरक्षित करने का वादा किया।

Web Title : Shubhendu Adhikari Becomes Bengal CM: First Reaction After Election

Web Summary : Shubhendu Adhikari is Bengal's new CM. He pledges action against Sandeshkhali culprits, honoring fallen BJP workers, and fulfilling manifesto promises. Amit Shah vows to stop infiltration and cow smuggling, securing Bengal's borders after BJP's victory.