वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह

Aravinda de Silva Sri Lanka Crime News: घटनेने प्रचंड खळबळ माजली असून प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:33 IST2026-05-08T18:32:50+5:302026-05-08T18:33:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sri Lanka Airlines ceo Kapila Chandrasena found dead at cricketer Aravinda de Silva residence | वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह

वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह

Aravinda de Silva Sri Lanka Crime News: श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि १९९६ विश्वचषक विजेते फलंदाज अरविंद डी सिल्वा यांच्या घरी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती श्रीलंका एअरलाइन्सचे CEO कपिला चंद्रसेना होते. ते डी सिल्वा यांच्या घरी आधी बेशुद्ध अवस्थेत आढळले. तपासणीअंती चंद्रसेना मृत असल्याचे निष्पन्न झाले. चंद्रसेना आणि अरविंद डी सिल्वा हे जवळचे नातेवाईक आहेत. चंद्रसेना यांनी अरविंद डी सिल्वा यांच्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

लाचखोरीचा सुरू होता खटला

कपिला चंद्रसेना यांच्यावर लाचखोरीचा खटला सुरू होता. त्यांच्यावर २.३ अब्ज डॉलर्सच्या एका व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप होता. असे वृत्त आहे की, चंद्रसेना यांनी एका बनावट कंपनीमार्फत २० लाख डॉलर्सची लाच स्वीकारली होती. कोलंबोच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. हे वॉरंट जारी झाल्यानंतर, चंद्रसेना ७ मे रोजी अरविंद डी सिल्वा यांच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे.

अरविंद डी सिल्वा यांची कारकीर्द

अरविंद डी सिल्वा हे श्रीलंकेच्या महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांनी श्रीलंकेसाठी ९३ कसोटी सामने खेळून ६,३६१ धावा केल्या. त्यांनी एकूण २० शतके झळकावली. एकदिवसीय सामन्यांमध्ये, अरविंद डी सिल्वा यांनी ९,२८४ धावा आणि ११ शतके केली. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये, डी सिल्वा यांनी ४३ शतकांसह १५,००० धावा केल्या. डी सिल्वा यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये १०६ आणि कसोटी सामन्यांमध्ये २९ बळीही घेतले.

१९९६ च्या विश्वचषकात अरविंद डी सिल्वाची कामगिरी

१९९६ च्या विश्वचषकात, अरविंद डी सिल्वाने श्रीलंकेसाठी सर्वाधिक ४४८ धावा केल्या. या उजव्या हाताच्या फलंदाजाची सरासरी जवळपास ९० होती आणि त्याचा स्ट्राइक रेट १०७.६९ होता. त्याने विश्वचषकात दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात अरविंद डी सिल्वाने एक शानदार शतक झळकावून संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात श्रीलंकेला २४२ धावांची गरज होती आणि डी सिल्वा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नाबाद १०७ धावा केल्या. त्याने, असंका गुरुसिंहा आणि अर्जुन रणतुंगा यांच्यासोबत मिळून श्रीलंकेला पहिल्यांदा विश्वविजेता बनण्यास मदत केली.

Web Title : श्रीलंकाई क्रिकेटर अरविंद डी सिल्वा के घर में CEO का शव मिला

Web Summary : श्रीलंका एयरलाइंस के सीईओ कपिला चंद्रसेना क्रिकेटर अरविंद डी सिल्वा के घर में मृत पाए गए। रिश्वतखोरी के आरोपों का सामना कर रहे चंद्रसेना ने कथित तौर पर आत्महत्या की। डी सिल्वा 1996 विश्व कप के प्रदर्शन के लिए जाने जाते हैं।

Web Title : CEO Found Dead at Sri Lankan Cricketer Aravinda de Silva's Home

Web Summary : Sri Lanka Airlines CEO Kapila Chandrasena was found dead at cricketer Aravinda de Silva's home. Facing bribery charges, Chandrasena allegedly committed suicide there. De Silva is a celebrated cricketer, known for his 1996 World Cup performance.