मोठी बातमी! मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 08:21 IST2026-05-08T08:21:20+5:302026-05-08T08:21:45+5:30

अग्निशामक जवानांनी रात्रभर अथक प्रयत्न करत पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

In Solapur, Massive fire breaks out at agricultural center in Mangalvedha; Losses worth crores | मोठी बातमी! मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान

मंगळवेढा - मंगळवेढा शहरात पुन्हा एकदा भीषण दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या मालकीच्या सुप्रसिद्ध “श्री जिजामाता कृषी केंद्र” या नामांकित कृषी सेवा केंद्राला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच दुकानातून आगीचे प्रचंड लोळ बाहेर पडू लागले. दुकानामध्ये कृषी औषधे, बियाणे, खते तसेच ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्याने आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशामक जवानांनी रात्रभर अथक प्रयत्न करत पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेत सहकार्य केले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किट अथवा अन्य कारणांबाबत तपास सुरू असल्याची माहिती मिळाली. 

Web Title : मंगळवेढ़ा में कृषि केंद्र में भीषण आग, करोड़ों का नुकसान

Web Summary : मंगळवेढ़ा में प्रदीप खांडेकर के श्री जिजामाता कृषि केंद्र में भीषण आग लगने से करोड़ों का नुकसान हुआ। दमकल कर्मियों ने रात भर आग बुझाने की कोशिश की। नुकसान का कारण अज्ञात है, लेकिन कोई जनहानि नहीं हुई।

Web Title : Massive Fire Engulfs Agri Center in Mangalwedha, Crores Lost

Web Summary : A devastating fire destroyed the Shree Jijamata Krishi Kendra in Mangalwedha, owned by Pradeep Khandekar, causing crores in losses. Firefighters battled the blaze through the night. The cause is under investigation; thankfully, no lives were lost.

टॅग्स :fireआग