निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 22:21 IST2026-05-08T22:19:39+5:302026-05-08T22:21:59+5:30
CM Devendra Fadnavis Reaction On Nida Khan Arrested: नाशिक TCS प्रकरणात निदा खानला लपण्यासाठी AIMIM नगरसेवकांनी मदत केल्याचे समोर येत असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
CM Devendra Fadnavis Reaction On Nida Khan Arrested: नाशिक टीसीएस प्रकरणात आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. निदा खानला लपून राहण्यासाठी AIMIM पक्षाच्या नगरसेवकाने मदत केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. या प्रकरणात कोण मदत करत आहे, कोणाचे आशीर्वाद आहेत, हे सगळे शोधून काढले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे स्पष्टपणे दिसत आहे की, निदा खानला लपवून ठेवण्यात एमआयएमच्या नगरसेवकांचा हात होता. या सगळ्याच्या पाठीमागे कोण होते, हेदेखील शोधून काढले जाईल. अशा प्रकारे धर्मांतरणाच्या रॅकेटमध्ये ते सामील आहेत का, हे जे रॅकेट आहे, ते त्याला मदत करत आहेत का, त्यांचा याला आशीर्वाद आहे का, हे सगळे शोधले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निदा खान छत्रपती संभाजीनगर येथे लपून बसली होती
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार व कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात (कार्पोरेट लव्ह जिहाद) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली. या प्रकरणातील फरार महिला आरोपी निदा खानला नारेगावातून अटक करण्यात आली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासून राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोप करत, एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
Mumbai: On Nashik TCS case, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "It is clear that the AIMIM corporator (Mateen Majid Patel) had a hand in hiding Nida Khan. Who was behind all this will be found out. Are they in the conversion racket? Did they help? It will be discovered." pic.twitter.com/k1YGKPRh88
— ANI (@ANI) May 8, 2026