Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका

अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वधारल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 23:05 IST2026-05-08T23:03:19+5:302026-05-08T23:05:39+5:30

अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वधारल्या आहेत. 

Will petrol and diesel prices increase Oil companies losses reach 30000 crores loss of 700 crores daily | पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका


मध्यपूर्वेतील युद्ध आणि होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव, यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढताना दिसत आहेत. शिपिंग आणि विमा खर्च प्रचंड वाढला आहे. परिणामी कंपन्यांच्या आयात खर्चातही वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी. गेल्या चार वर्षांपासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र, याचा मोठा फटका तेल कंपन्यांना बसत आहे. अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वधारल्या आहेत. 

कंपन्यांना दररोज ६०० ते ७०० कोटींचे नुकसान -
पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकलनानुसार, केवळ मार्च आणि एप्रिल दरम्यान इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तिनही सरकारी कंपन्यांचा एकत्रित तोटा ३० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपन्यांना दररोज ६०० ते ७०० कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्यात कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १८ रुपये तर डिझेलवर २५ रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.

आयात खर्च ५० टक्क्यांनी वाढला -
इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांचा आयात खर्च ५० टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, सरकारी हस्तक्षेपामुळे त्यांना किमती वाढवता येत नसल्याने हा तोटा वाढत चालला आहे. 

तर तेल कंपन्यांचा हाच तोटा ६२५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असता -
महत्वाचे म्हणजे, या संकटात दिलासा म्हणून केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये १० रुपयांची कपात केली आहे. जर सरकारने ही कपात केली नसती, तर तेल कंपन्यांचा हाच तोटा ६२५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असता.

 

Web Title : पेट्रोल-डीजल के दाम बढ़ेंगे? तेल कंपनियों को भारी नुकसान।

Web Summary : कच्चे तेल की बढ़ती कीमतों और स्थिर घरेलू कीमतों के कारण भारतीय तेल कंपनियों को भारी नुकसान हो रहा है। कंपनियों को प्रतिदिन ₹600-700 करोड़ का नुकसान हो रहा है, कुल नुकसान ₹30,000 करोड़ तक पहुंच गया है। सरकारी उत्पाद शुल्क में कटौती से कुछ राहत मिली।

Web Title : Petrol-Diesel Prices Hike Imminent? Oil Companies Face Huge Losses.

Web Summary : Rising crude oil prices and stable domestic prices are causing massive losses for Indian oil companies. The companies are losing ₹600-700 crore daily, with total losses reaching ₹30,000 crore. Government excise duty cuts provided some relief.