देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maha Vikas Aghadi Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीतील अपयशावरून ठाकरेंच्या नेत्याने थेट काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यानेही ठाकरेंच्या नेत्याला सुनावले. ...
Bihar Assembly Election Votes: महाआघाडीत राजदने व्यक्तिगत स्तरावर सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान निश्चित केले असले तरी, संपूर्ण आघाडीला बहुमत मिळवता आले नाही. ...
AIMIM Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पण, या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमची कामगिरी काँग्रेसपेक्षा सरस राहिली आहे. ...