CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाविरोधात 130 औषधांचं ट्रायल; 'हे' औषध ठरतंय आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 08:47 AM2020-05-24T08:47:25+5:302020-05-24T09:04:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: तब्बल 130 औषधांचं ट्रायल सुरू असून त्यापैकी एक औषध सर्वात जास्त प्रभावी असल्याची माहिती आता तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे.

कोरोना व्हायरसचा जगभरातील तब्बल 53 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून 3 लाख 40 हजारांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात सुमारे 115 ठिकाणी संशोधन सुरू असून, त्यात भारतातील सात कंपन्या व विज्ञान संस्थांचा सहभाग आहे.

ज्या संशोधनासाठी कमाल पाच वर्षे लागू शकतात तेच संशोधन 18 ते 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे व जगाची कोरोनाच्या साथीपासून कायमची मुक्तता करण्याचे ध्येय शास्त्रज्ञांनी बाळगले आहे.

लस बनविण्यासाठी आतापर्यंत वापरण्यात येणारी व काहीशी वेळखाऊ पद्धत कोरोना साथीच्या हाहाकारानंतर बाजूला ठेवण्यात आली. सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

विविध देशांतील सरकार, स्वयंसेवी संस्था व औषध कंपन्या यांनीदेखील कोविड-19 या व्हायरसवर लस शोधण्यासाठी परस्परांचे सहकार्य घेत आहेत.

कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.

तब्बल 130 औषधांचं ट्रायल सुरू असून त्यापैकी एक औषध सर्वात प्रभावी असल्याची माहिती आता तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे.

अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायसवर उपचारासाठी 130 पेक्षा जास्त औषधांचं परीक्षण सध्या सुरू आहे.

काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं ही रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात.

कोरोनाच्या लढ्याला यश येत असून यामध्ये 'रेमडेसिवीर' हे औषध अत्यंत प्रभावी असल्याची माहिती आता समोर येत आहे. या औषधामुळे लोकं लवकर बरे होण्यास मदत होत आहे.

कोरोना व्हायरसविरोधात सध्या एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे इतर आजारांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या औषधांचा कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी प्रयोग. याचं एक उदाहरण म्हणजे रेमडेसिवीर असं सीएसआयआरच्या राम विश्वकर्मा यांनी म्हटलं आहे.

रेमडेसिवीर या औषधामुळे गंभीर रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. हे औषध जीवनरक्षक ठरू शकतं अशी माहिती विश्वकर्मा यांनी दिली आहे.

'सध्या तरी कोरोना व्हायरसविरोधात नवीन औषध तयार करण्याइतपत पुरेसा वेळ आपल्याकडे नाही. नवीन औषध विकसित करण्यासाठी 5 ते 10 वर्षे लागू शकतात.'

आपण सध्या जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करत आहोत. या औषधांचं क्लिनिकल ट्रायल घेऊन ही औषधं प्रभावी आहेत की नाहीत हे तपासत आहोत असं देखील विश्वकर्मा यांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.