यू ट्युबलाच करिअर बनवून कमावलं नाव, आज लाखो लोक आहेत फॉलोअर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:58 PM2019-06-18T17:58:54+5:302019-06-18T18:03:53+5:30

सोशल मीडिया हे सध्या प्रभावी माध्यम बनत चाललं आहे. सोशल मीडिया आपल्याला एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आणू शकते. सोशल मीडियातला यू ट्युब हा एक प्लॅटफॉर्म असून, ज्यावर आपल्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यू ट्युबच्या माध्यमातून आपण हक्काचे पैसे कमावू शकतो. भुवन बामसुद्धा स्वतःच्या BB Ki Vines या यू ट्युब चॅनेलवरून प्रेक्षकांना हसवत असतात. हा देशातला पहिला यू ट्युब चॅनेल आहे, ज्यानं सर्वात आधी यश मिळवलं आहे.

अमित भडानाही यू ट्युबवर विनोदाच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहे. स्वतःच्या कलेनं तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.

गौरव चौधरी यू ट्युबवर टेक्नॉलॉजी गुरू म्हणून प्रसिद्ध आहे. यू ट्युबवर याचे 2260926 एवढे फॉलोअर्स आहेत.

संदीप माहेश्वरी जबरदस्त स्पीकर आहे. तो लोकांना स्वभावाचे विशेषगुणांचं वगैरे महत्त्व सांगतो. संदीपचे यू ट्युबवर 10712383 फॉलोअर्स आहेत.

अजय नागर यांचा आवाजच त्यांची ओळख आहे. हरियाणातल्या अजय यांच्या यू ट्युब चॅनेलचं नाव CarryMinati असून, त्यांचे 7010012 फॉलोअर्स आहेत.