वॉशिंग मशीन सुरू असताना शॉवर घेणं धोक्याचं, पाहा मशीन बंद झाल्यानंतर ४० मिनिटांनी का करावी आंघोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 15:40 IST2026-04-19T15:18:06+5:302026-04-19T15:40:30+5:30

अनेक लोक याचा संबंध पाण्याच्या प्रेशरशी किंवा अचानक थंड पाणी येण्याशी जोडतात, पण खरं कारण त्यापेक्षा खूप धोकादायक आहे.

अनेकदा आपण इलेक्ट्रिशियनकडून ऐकतो की वॉशिंग मशीन चालू असताना शॉवर घेऊ नये. सुरुवातीला ही गोष्ट थोडी विचित्र वाटते, पण यामागे एक गंभीर कारण आहे. अनेक लोक याचा संबंध पाण्याच्या प्रेशरशी किंवा अचानक थंड पाणी येण्याशी जोडतात, पण खरं कारण त्यापेक्षा खूप धोकादायक आहे.

TOI च्या एका रिपोर्टनुसार, हा धोका पाणी आणि “लीकेज करंट” यांच्या धोकादायक कनेक्शनशी संबंधित आहे. जर तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये अगदी थोडंही इलेक्ट्रिकल लीकेज असेल, तर हा करंट घरातील पाइपलाईनमधून पसरू शकतो. अशावेळी तुम्ही शॉवर घेत असाल, तर तुमचं शरीर त्या करंटसाठी “ग्राउंड” बनू शकतं आणि करंट तुमच्या शरीरातून जाऊ शकतो. ही परिस्थिती अत्यंत जीवघेणी ठरू शकते.

अशा अपघातांपासून वाचण्यासाठी योग्य ग्राउंडिंग आणि GFCI सारखी सेफ्टी सिस्टीम खूप महत्त्वाची असते. खासकरून जर घरातील पाइपलाईन मेटलची असेल, तर बिघाड झाल्यास संपूर्ण बाथरूम करंटचा मार्ग बनू शकतो. त्यामुळे सर्व इलेक्ट्रिकल उपकरणे योग्य प्रकारे ग्राउंड केलेली असणे आणि वेळोवेळी इलेक्ट्रिकल तपासणी करणे आवश्यक आहे.

बहुतेक घरांमध्ये वॉशिंग मशीन आणि बाथरूमची पाइपलाईन एकाच सिस्टीमशी जोडलेली असते. त्यामुळे मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास त्यातून बाहेर येणारे पाणी इलेक्ट्रिक चार्ज होऊ शकते. या पाण्यात डिटर्जंट आणि मिनरल्स असल्यामुळे ते वीज सहज वाहून नेतात. अशावेळी बाथरूमची ओली फरशीही करंटचा माध्यम बनू शकते, जे अत्यंत धोकादायक आहे.

वॉशिंग मशीन चालू असताना त्यात कंपण होत असतं. कालांतराने या कंपणामुळे आतल्या वायरिंगला नुकसान होऊ शकतं. जर एखादी लाईव्ह वायर मशीनच्या मेटल भागाला किंवा पंपला लागली, तर करंट पाण्याच्या माध्यमातून संपूर्ण पाइपलाईनमध्ये पसरू शकतो.

तज्ञांच्या मते, वॉशिंग मशीन बंद झाल्यानंतर किमान 30 ते 40 मिनिटे थांबून मगच शॉवर घ्यावा. यामुळे मशीनमधील उरलेले पाणी पूर्णपणे बाहेर पडते आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमही सुरक्षित स्थितीत येतं. थोडा वेळ थांबल्याने मोठा धोका टळू शकतो.

अशा घटना कमी प्रमाणात घडतात, पण त्यांचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. त्यामुळे घरातील वायरिंग, ग्राउंडिंग आणि उपकरणांची स्थिती याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. छोटासा निष्काळजीपणाही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. योग्य काळजी घेतल्यास आपण आपलं घर सुरक्षित ठेवू शकता.