हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 16:47 IST2026-04-19T16:44:05+5:302026-04-19T16:47:11+5:30
Viral Girl Harsha: महाकुंभ मेळ्यात प्रसिद्धीस आलेली हर्षा रिछारिया हिने आता संन्यास घेतला आहे. तिने उज्जैनमध्ये स्वतःचे पिंडदान करत संसार सुखाचा त्याग केला आहे.

हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Harsha Richhariya new name after sanyas: महाकुंभ मेळ्यात सौंदर्यामुळे प्रसिद्धी मिळालेली हर्षा रिछारिया हिने संन्यास घेतला. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये रविवारी तिने स्वतःचे पिंडदान केले. मंगलनाथ येथील गंगाघाटावर मोनी तीर्थ पीठाधीश्वर सुमनाजी महाराज यांच्याकडून हर्षाने दीक्षा घेतली. संसार सुखाचा त्याग करत हर्षाने संन्यासी जीवनात प्रवेश केला. साध्वी बनल्यानंतर हर्षाला हर्षानंद गिरी महाराज असे नवे नाव मिळाले आहे.
हर्षा रिछारिया ही मूळची मध्य प्रदेशातील भोपाळचीच रहिवासी आहे. ती अँकर, सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर, तसेच मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती. २०२५ मध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात हर्षाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
भगव्या वस्त्रांमध्ये हर्षा सांधु-संतांसोबत दिसली होती. सुंदर साध्वी म्हणून ती सोशल मीडियावर चर्चेत आली आणि तिची लोकप्रियता वाढली. पण, त्याच काळात तिचे जुने फोटो समोर आले आणि वाद झाला होता. त्यानंतर हर्षा रिछारिया सातत्याने चर्चेत राहिली.
साध्वी हर्षानंद गिरीने घेतली शपथ
हर्षा रिछारिया १९ एप्रिल रोजी उज्जैनला पोहोचली. तिथे मंगलनाथ येथील गंगाघाटावर मोनी तीर्थ पीठाधीश्वर, तथा ममहामंडलेश्वर सुमनाजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेत तिने संन्यासी जीवनात प्रवेश केला.
Ujjain, Madhya Pradesh: Model and influencer Harsha Richhariya performed her own pinddaan and embraced sanyas. Rituals were completed at the Moun Tirth Ashram in Ujjain in the presence of Mahamandaleshwar Sumananand Maharaj, where she was given sanyas diksha according to… pic.twitter.com/7jiw4gT4SD
— IANS (@ians_india) April 19, 2026
संन्यास घेतल्यानंतर हर्षा म्हणाली की, प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभ मेळ्यातच मला संकेत मिळाले होते की, आता पुढे कोणत्या दिशेने जायला हवे. गुरुजींनी मार्गदर्शन केले. संध्या दीक्षा झाली आहे. त्यांच्याच आशीर्वादाने पुढे जाणार आहे. असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे संन्यासी जीवनाला डाग लागेल, अशी शपथ गुरुजींनी दिली आहे.
मोनी तीर्थ पीठाधीश्वर सुमनानंद म्हणाले की, हर्षाची संन्यास दीक्षा विधिवत केली गेली आहे. यात शिखा आणि दंड यांचा त्याग झाला आहे. हर्षाने स्वतःचे पिंडदान केले आहे. आता तिचे नाव हर्षानंद गिरी झाले आहे.