Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव

. या विकेटसह वरुण चक्रवर्तीनं टी-२० कारकिर्दीत २०० विकेट्सचा डाव साधला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 17:39 IST2026-04-19T17:37:25+5:302026-04-19T17:39:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 KKR vs RR Varun Chakravarthy hits 200 T20 wickets, dismisses Vaibhav Suryavanshi With Dhruv Jurel And Riyan Parag | Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव

Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव

IPL 2026 KKR vs RR Varun Chakravarthy hits 200 T20 wickets, dismisses Vaibhav Suryavanshi :आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संघर्ष करत असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रविवारी ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानात रॉयल्स विरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल जोडीनं पुन्हा एकदा संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडत वरुण चक्रवर्तीनं संघाला मोठा दिलासा दिला. त्याने वैभव सूर्यवंशीला ४६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटसह वरुण चक्रवर्तीनं टी-२० कारकिर्दीत २०० विकेट्सचा डाव साधला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

....अन् राजस्थानचे धाकड बॅटर वरुण चक्रवर्तीच्या चक्रव्युव्हात फसले

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा नंबर वन गोलंदाज ठरलेल्या वरुण चक्रवर्तीला यंदाच्या हंगामात आपल्या फिरकीची जादू दाखवता आली नव्हती. पण कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात तो फॉर्ममध्ये परतला. वैभव सूर्यवंशी पाठोपाठ त्याने ध्रुव जुरेल चकवा देत  टिम सिफर्टच्या साथीनं दुसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली. एवढ्यावरच न थांबता कर्णधार रियान परागलाही त्याने आपल्या चक्रव्युव्हात फसवले. राजस्थानचा कर्णधार १४ चेंडूत १२ धावांवर माघारी फिरला. वरुण चक्रवर्तीनं ४ षटकात फक्त १४ धावा खर्च करत ३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.

"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
 
केकेआरकडून  १०० विकेट्सचा डाव साधणारा तिसरा गोलंदाज

वरुण चक्रवर्ती हा कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख गोलंदाज आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने IPL मध्ये १०० विकेट्सचा डाव साधला होता. जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय  स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून १०० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी केकेआरकडून १०० पेक्षा अधिक विेट्स घेतल्या आहेत.  

गुजरात विरुद्ध खाते उघडले अन् पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये परतला चक्रव्रती

यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात विकेट लेस राहिल्यावर गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ३४ चेंडूत २ विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीसह आयपीएलमध्ये शतकी डाव साधल्यावर आता त्याने राजस्थान विरुद्ध ३ विकेट्स घेत टी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्सचा पल्ला गाठला आहे.

Web Title : वरुण चक्रवर्ती ने 200 टी20 विकेट लिए, वैभव सूर्यवंशी को आउट किया

Web Summary : वरुण चक्रवर्ती ने केकेआर बनाम आरआर आईपीएल मैच के दौरान वैभव सूर्यवंशी को आउट करके 200 टी20 विकेट पूरे किए। उन्होंने 14 रन देकर 3 विकेट लिए, जिससे केकेआर को मदद मिली। यह उपलब्धि पिछले गेम में उनके 100वें आईपीएल विकेट के बाद मिली है। वह केकेआर के तीसरे गेंदबाज हैं जिन्होंने 100+ विकेट लिए हैं।

Web Title : Varun Chakravarthy Reaches 200 T20 Wickets, Dismisses Vaibhav Suryavanshi

Web Summary : Varun Chakravarthy achieved 200 T20 wickets, dismissing Vaibhav Suryavanshi during the KKR vs RR IPL match. He took 3 wickets for 14 runs, helping KKR. This milestone follows his 100th IPL wicket in the previous game. He is the third KKR bowler to take 100+ wickets.