IPL KKR vs RR Jofra Archer Equals Mohammed Shami Record : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात १५५ धावांचा बचाव करताना जोफ्रा आर्चरनेराजस्थान रॉयल्सच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने टिम सिफर्टला शून्यावर माघारी धाडले. IPL च्या हंगामात सलग तिसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरनं पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. या कामगिरीसह त्याने IPL स्पर्धेत सर्वाधिक वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर टिम सिफर्टचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित करण्याआधी जोफ्रा आर्चरनं सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला 'गोल्डन डक'सह तंबूचा रस्ता दाखवला होता. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सामन्यात त्याने फिल सॉल्टवर हीच वेळ आणली होती.
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
जोफ्रा आर्चरनं अनोख्या हॅटट्रिकसह IPL मध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. IPL मध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून अनुभवी मोहम्मद शमीनं आतापर्यंतच्या आपल्या आयपीएल कारकिर्दीत १२४ सामन्यात पाच वेळा पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामात सलग तीन सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेत जोफ्रा आर्चरनं ५८ व्या सामन्यात पाच वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे. राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोफ्रा आर्चर याआधी मुंबई इंडियन्सकडूनही खेळताना दिसला आहे.
IPL मध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा विकेट (रेकॉर्ड)
- ५ – मोहम्मद शमी
- ५ – जोफ्रा आर्चर
- ३ – प्रवीण कुमार
- ३ – उमेश यादव
- ३ – ट्रेंट बोल्ट
- ३ – लसिथ मलिंगा
- ३ – भुवेश्वर कुमार
- ३ – अशोक दिंडा