अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:44 IST2026-04-19T19:44:11+5:302026-04-19T19:44:47+5:30

विदर्भात सूर्य आग ओकत, सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे

Akola, Wardha hottest in the country; mercury at 45 degrees Celsius | अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा

अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा

अकोला : उष्णतेच्या लाटेने विदर्भ होरपळून निघत असून रविवारी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. देशात रविवारी सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानअकोला आणि वर्धा येथे नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असून नागपूर व अमरावती येथेही तापमान ४४ अंशांच्या वर नोंदविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे आणि तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी काही भागात ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट झाली होती; मात्र त्यानंतर पुन्हा तापमानात मोठी वाढ झाली. अकोल्याचे तापमान एका दिवसात १.७ अंशांनी वाढले. रविवारी पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला व वर्धा येथे झाली. यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पारा ४० अंशांच्या वर

विदर्भासह मराठवाड्यातील सर्व प्रमुख शहरांचे तापमान ४० अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रात जळगाव, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर येथे तापमान ४० ते ४३ अंशांदरम्यान राहिले.

विदर्भात दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट

एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट असताना हवामान खात्याने सोमवार व मंगळवार या दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेने होरपळलेल्या विदर्भाला पुढील काही दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भातील रविवारचे तापमान (अंश सेल्सिअस)

अकोला : ४५.०
वर्धा : ४५.०
नागपूर : ४४.४
अमरावती : ४४.२
गोंदिया : ४३.५
यवतमाळ : ४३.२
ब्रह्मपुरी : ४३.२
गडचिरोली : ४३.२
भंडारा : ४३.०
वाशिम : ४२.६
चंद्रपूर : ४२.२
बुलढाणा : ४१.२

Web Title : अकोला, वर्धा देश में सबसे गर्म; पारा 45 डिग्री सेल्सियस के पार

Web Summary : अकोला और वर्धा में भारत का सर्वाधिक तापमान 45 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। विदर्भ के सभी शहरों का तापमान 41 डिग्री सेल्सियस से अधिक रहा, नागपुर और अमरावती में 44 डिग्री सेल्सियस से ऊपर। मराठवाड़ा में भी 40 डिग्री सेल्सियस से अधिक तापमान रहा। विदर्भ के लिए बारिश का येलो अलर्ट जारी किया गया है।

Web Title : Akola, Wardha Hottest in India; Mercury Crosses 45 Degrees Celsius

Web Summary : Akola and Wardha recorded India's highest temperature at 45°C. Vidarbha's cities exceeded 41°C, with Nagpur and Amravati above 44°C. Marathwada also hit 40°C+. A yellow alert for rain has been issued for Vidarbha.