देशात आयपीएलचा थरार रंगला असताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघात नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळाली. रविवारी डरबनच्या मैदानातील लढतीत २३ वर्षीय अष्टपैलू अनुष्का शर्मा हिने टीम इंडियात एन्ट्री मारली. सामन्याआधी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं तिला टीम इंडियाची कॅप दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे टीम इंडियात एन्ट्री मारणारी अनुष्का शर्मा?
अनुष्का शर्मा ही मध्य प्रदेशची खेळाडू आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) आणि महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत तिने आपल्या कामगिरीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. उजव्या हाताने बॅटिंगसह बॉलिंगमध्ये ती उपयुक्त कामगिरी करु शकते. मध्यफळीतील भरवशाची बॅटर म्हणून तिने खास छाप सोडली आहे. WPL २०२६ च्या हंगामात गुजरात जायंट्सकडून खेळताना तिने७ डावांत १७७ धावा केल्या होत्या. याशिवाय आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत तिने ११६ धावांचे योगदान दिले होते.
सांगलीची लेक स्मृती मानधना ठरली 'टी-२० क्वीन'; रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला!
देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने सीनियर महिला इंटर झोनल ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोनसाठी ५८ चेंडूत ८० धावांची खेळी केली आणि पाच सामन्यांत एकूण १५५ धावा केल्या. त्यानंतर सीनियर महिला T20 ट्रॉफीत 207 धावा केल्या. मध्य प्रदेश महिला लीगमध्ये ती दुसरी सर्वाधिक धावा करणारी बॅटर ठरली.
पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक हुकलं, पण...
पदार्पणाच्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना चौथ्या क्रमांकावर ती फलंदाजीसाठी उतरली. ३१ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २८ धावांची खेळी करत तिने तिसऱ्या विकेटसाठी शेफाली वर्माच्या साथीनं ४६ चेंडूत ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या सामन्यात तिचे अर्धशक हुकले. पण तिने टीम इंडियाकडून दुसरी सर्वोच्च धावसंख्या करत संघाला मोठा दिलासा दिला.