चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 21:52 IST2026-04-19T21:51:50+5:302026-04-19T21:52:56+5:30

दुसरा मुलगा सुखरूप सापडला : जिल्हा पोलिस अधीक्षक तळ ठोकून

Chakur was shocked; the body of one of the two missing young siblings was found! | चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!

AI Generated Image

चाकूर (जि. लातूर) : शहरातील जुन्या महादेव मंदिर परिसरातील एका पुजाऱ्याचे दोन नातू रविवारी सकाळी बेपत्ता होते. त्यातील देवांश मंगेश स्वामी (वय ७) याचा मृतदेह घराजवळील एका पडक्या जागेत दुपारी आढळला. दुसरा नातू साईचरण दिनेश स्वामी (वय १०) हा सायंकाळी सुखरूप सापडला असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या घटनेने चाकूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाेलिसांनी सांगितले, चाकूर शहरातील जुने महादेव मंदिर परिसरात चंद्रकांत स्वामी हे वास्तव्याला आहेत. त्यांना संतोष, दिनेश आणि मंगेश अशी तीन मुले आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. चंद्रकांत स्वामी आणि दिनेश स्वामी एकाच ठिकाणी राहतात. दिनेश यांचा दहा वर्षीय मुलगा साईचरण आणि मंगेश स्वामी यांचा सात वर्षीय मुलगा देवांश हे घराजवळील महादेव मंदिरात रविवारी सकाळी पूजेसाठी गेले होते. मात्र, ते न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.

दुपारी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊन दोन मुले गायब झाल्याचे पाेलिसांना सांगितले. त्यावेळी पाेलिस निरीक्षक बालाजी भंडे, पोलिस उपनिरीक्षक पंकज निळकंठे, रमेश चव्हाण, किरण रायझुबे, अच्युत सूर्यवंशी, पोहेकाॅ. गोविंद बोळंगे, श्रीमंत आरदवाड, हनुमंत मस्के, चंद्रशेखर डिगोळे, आकाश कातपुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी महादेव मंदिर परिसरात शाेधाशाेध सुरु केली. त्यावेळी एका पडक्या वाड्यात संशयास्पद डोके आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता, एका टायरमध्ये देवांशचा मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर प्लास्टिक टाकण्यात आले होते.

दोन भावंडे सायकलवर फिरल्याचे फुटेजमध्ये आढळले...

पोलिसांनी चाकूर शहरातील काही ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, साईचरण आणि देवांश हे दोघे सकाळी ७.०७ मिनिटाला आझाद चौकात सायकलवर फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर ते गायब झाले. देवांशचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण शहर हादरून गेले.

पाेलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल...

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि. राजेश घाडगे यांच्यासह स्थागुशाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पाेलिसांनी जप्त केला बूट, गमजा...

श्वान पथक दिनेश स्वामी यांच्या घरापासून मंगेश यांचे घर आणि एक गल्लीला फेरी मारून पुन्हा घटनास्थळी आले. तेथून देवांशच्या पायातील बूट, गळ्यातील भगवा गमजा पोलिसांनी जप्त केला.

पाेलिसांनी घेतला साईचरणचा शोध...

देवांशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यावेळी नातेवाईकांनी देवांशच्या उत्तरीय तपासणीला विरोध करीत अगोदर आरोपीचा शोध घ्या आणि त्यानंतर उत्तरीय तपासणी करा, असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिस आणि डॉक्टरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सायंकाळी साईचरणचा शोध घेण्यात पाेलिसांना यश आले. ताे सुखरूप सापडला आहे, असे पाेलिसांनी सांगितले.

Web Title : चाकूर में सनसनी: लापता दो भाइयों में से एक मृत मिला!

Web Summary : चाकूर में सनसनी फैल गई जब 7 वर्षीय लड़का अपने घर के पास मृत पाया गया, वह अपने 10 वर्षीय भाई के साथ लापता हो गया था। दूसरा भाई बाद में सुरक्षित पाया गया। पुलिस मौत की जांच कर रही है।

Web Title : Chakur Shaken: One of Two Missing Brothers Found Dead!

Web Summary : Chakur was shaken after a 7-year-old boy was found dead near his home after he and his 10-year-old brother went missing. The other brother was later found safe. Police are investigating the death.

टॅग्स :laturलातूर