कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात राजस्थान रॉयल्सला पराभूत करत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने पहिला विजय नोंदवला. पण या सामन्यात विकेटमागील कमालीच्या चपळाईसह अद्भूत स्टंपिंगसह ध्रुव जुरेल "हार के जितनेवाला बाजीगर" ठरला. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या ध्रुव जुरेलनं कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील २५ कोटींचा सर्वात महागडा ऑल राउंडर कॅमरून ग्रीनची केलेली शिकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही त्याच्या स्टंपिंगचे कौतुक केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ध्रुव जुरेलची कमाल, पापणी लवते न लवते तोच... कॅमरून ग्रीनचा 'खेळ खल्लास!
धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. संघ अडचणीत असताना कॅमरून ग्रीन याने संघाचा डाव सावरण्यासाठी पुढाकार घेतला. पण डावातील पाचव्या षटकात रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर विकेट मागे त्याला काही कळण्याआत ध्रुव जुरेलनं त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. बिश्नोईच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला. लेग साइडच्या दिशेला टाकलेला वाइड चेंडूवर ध्रुव जुरेलनं कमालीचे नियंत्रण राखत स्टंपिंगचा डाव साधला. कॅमरून ग्रीन १३ चेंडूत २७ धावा करून माघारी फिरला.
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
ध्रुव जुरेलसाठी सचिन तेंडुलकरचं खास ट्विट
सोशल मीडियावर ध्रुव जुरेलच्या स्टंपिंगची तुलना थेट धोनीशी केली जात आहे. काहीजण तर त्याच्यासारखी खतरनाक स्टंपिंग याआधी कधीच पाहिली नाही, अशा प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक्स अकाउंटवरुन खास ट्विट करत ध्रुव जुरेलच्या स्टंपिंगला दाद दिली आहे. "फक्त एकच स्टंप दिसत होती, हालचालीसह डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत सगळ घडलं. अप्रतिम ध्रुव जुरेल. अशा आशयाच्या शब्दांत सचिनने युवा विकेट किपरच्या भन्नाट कामगिरीचं कौतुक केलं आहे.