IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात एका हंगामात सलग सहा सामन्यानंतर अपराजित राहणारी पहिली टीम ठरली पंजाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 23:33 IST2026-04-19T23:32:31+5:302026-04-19T23:33:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
PBKS vs LSG Priyansh Arya Cooper Connolly Super Hit Show Punjab Kings to 54-run win over Lucknow Super Giants in IPL 2026 | IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Punjab Kings Won By 54 Runs vs Lucknow Super Giants : प्रियांश आर्य आणि कूपर कॉनॉली यांच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने उभारलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्सचा संघ हतबल ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सने निर्धारित २० षटकांत २५४ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या संघाने सलामीच्या रुपात नवा आणि समजण्यापलिकडचा प्रयोग आजमावला. मिचेल मार्शच्या साथीनं आयुष बडोनी याने डावाची सुरुवात केली. तिसऱ्या क्रमांकावर स्वत: कर्णधार फलंदाजीला आला. पण एवढे करूनही डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारू शकला. पंजाब किंग्सने ५४ धावांनी विजय नोंदवत नवा इतिहास रचला आहे. पंजाब किंग्सचा संघ आयपीएलच्या आतापर्यंतच्या १९ वर्षांच्या इतिहासात एका हंगामात सलग सहा सामन्यानंतर अपराजित राहणारा पहिला संघ ठरला आहे.
 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

प्रियांश आर्य आणि कूपर कॉलॉनीचा धमाका

लखनौ सुपर जाएंट्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगने पंजाबच्या डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीननं प्रभसिमरन सिंगला खातेही न उघडू देता तंबूचा रस्ता दाखवला. पण त्यानंतर न्यू चंडीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर  प्रियांश आर्य आणि कूपर कॉनॉली या दोघांनी षटकार चौकारांची आतषबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १८२ धावांची दमदार भागीदारी रचली. कूपर कॉनोली याने ४६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला प्रियांश आर्य याने फक्त ३७ चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ९३ धावांची खेळी केली. दोघांचे शतक हुकले. पण या जोडीच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिस २९ (१६), नेहल वढेरा १३ (१७), शशांक सिंह १७ (६) यांनी उपयुक्त धावा करत  संघाच्या धावफलकावर २५४ धावा लावल्या. ही यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. 

शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम

LSG नं नवा प्रयोग केला, पण काहीच उपयोग नाही झाला

या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाकडून मिचेल मार्श ४० (२८) आणि आयुष बडोनी ३५(२१) या जोडीनं लखनौच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी पॉवर प्लेमध्ये १० च्या सरासरीसह ६१ धावा कुटल्या.  पण डोंगरा एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना यापेक्षा वादळी खेळीची गरज होती. रिषभ पंतने २३ चेंडूत ४३ धावा आणि मार्करमन २२ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. पण निकोलस पूरन पुन्हा अपयशी ठरला. परिणामी लखनौचा संघ निर्धारित २० षटकात २०० धावांवरच अडखळला. १३ व्या षटकात एडन मार्करमनं गोलंदाजीला येऊन दिलेल्या ३२ धावांचा पंजाब किंग्सला फायदा झाला. या षटकाच्या जोरावरच त्यांना यंदाच्या हंगामात विक्रमी धावसंख्येचा डाव साधणं सहज शक्य झालं. 

Web Title : पंजाब किंग्स ने LSG को हराया: 19 साल बाद रचा इतिहास!

Web Summary : पंजाब किंग्स ने लखनऊ सुपर जायंट्स को 54 रनों से हराया, इस सीजन का अपना उच्चतम स्कोर बनाया। प्रियांश आर्य और कूपर कॉनॉली की विस्फोटक साझेदारी ने पंजाब को जीत दिलाई, जो 19 वर्षों के बाद एक ऐतिहासिक क्षण है।

Web Title : Punjab Kings stun LSG: Record win after 19 years!

Web Summary : Punjab Kings defeated Lucknow Super Giants by 54 runs, achieving their highest score this season. Priyansh Arya and Cooper Connolly's explosive partnership powered Punjab to victory, marking a historic moment after 19 years.