'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:42 IST2026-04-19T19:42:03+5:302026-04-19T19:42:57+5:30

America-Iran Crisis: इराणने युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा ट्रम्प यांचा दावा

America-Iran Crisis: 'then we will destroy Iran's power plants', Donald Trump's direct warning before the peace meeting in Pakistan | '...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

America-Iran Crisis: एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानात बैठका होत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला हल्ल्याचा इशारा दिला आहे. इस्लामाबाद येथे सुरू होणाऱ्या शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणने प्रस्तावित करार नाकारल्यास अमेरिका त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करेल.

सीजफायर उल्लंघनाचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत दावा केला की, इराणने होर्मुझ सामुद्रधूनी परिसरात फ्रान्स आणि युनायटेड किंगडमशी संबंधित जहाजांवर गोळीबार केला. हे युद्धविराम कराराचे पूर्ण उल्लंघन आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करण्यास तयार आहोत. इराणने करार मान्य न केल्यास त्यांचे पावर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त केले जातील. आता कोणतीही दयावया दाखवली जाणार नाही, असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिला.

अमेरिकन प्रतिनिधी इस्लामाबादकडे रवाना

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, चर्चेसाठी अमेरिकेचे प्रतिनिधी इस्लामाबादला जाणार आहेत. आम्ही एक अत्यंत न्याय्य आणि वाजवी 'करार' सादर करत आहोत. मला आशा आहे की ते तो स्वीकारतील, असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केली. दरम्यान, इस्लामाबाद येथे आयोजित बैठकीत उपराष्ट्रपती जेडी वेंस प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार असून, स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनरही सहभागी होणार आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीचे जागतिक महत्त्व

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील अत्यंत महत्त्वाची समुद्री मार्गिका आहे. जगातील सुमारे २०% तेल आणि गॅस वाहतूक याच मार्गाने होते. येथे तणाव वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. या तणावामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.

Web Title : ट्रंप की ईरान को धमकी: सौदा अस्वीकार होने पर पावर प्लांट नष्ट कर देंगे

Web Summary : पाकिस्तान में शांति वार्ता के बीच, ट्रंप ने ईरान को प्रस्तावित सौदा अस्वीकार करने पर बुनियादी ढांचे पर हमले की धमकी दी। उन्होंने होर्मुज जलडमरूमध्य में युद्धविराम उल्लंघन का आरोप लगाया और गंभीर परिणाम की चेतावनी दी। अमेरिकी प्रतिनिधिमंडल इस्लामाबाद के लिए रवाना हो रहा है।

Web Title : Trump Warns Iran: Destroy Power Plants If Deal Rejected

Web Summary : Amid Pakistan peace talks, Trump threatened Iran with infrastructure attacks if they reject a proposed deal. He alleged ceasefire violations in the Strait of Hormuz and warned of severe consequences. US representatives are heading to Islamabad for negotiations.