Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 22:00 IST2026-04-19T21:59:45+5:302026-04-19T22:00:57+5:30
अनुश्री मानेला 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर जावं लागलं. सर्वांना वाटत होतं अनुश्री टॉप २ पर्यंत मजल मारुन घराचे लाईट्स बंद करुन बाहेर येईल. परंतु अनुश्रीचं अचानक चौथ्या नंबरला एविक्शन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे.

Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. ग्रँड फिनालेच्या पहिल्याच एलिमिनेशनमध्ये दिपाली सय्यदला घराबाहेर जावं लागलं. आता 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दुसरं एलिमिनेशन पार पडलं. त्यामध्ये अनुश्री मानेला 'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर जावं लागलं. सर्वांना वाटत होतं अनुश्री टॉप २ पर्यंत मजल मारुन घराचे लाईट्स बंद करुन बाहेर येईल. परंतु अनुश्रीचं अचानक चौथ्या नंबरला एविक्शन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
अनुश्री माने घराबाहेर
अनुश्री माने घरात सुरुवातीपासूनच एक स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखली जात होती. परंतु अनेकदा उद्धट, उर्मट वर्तनामुळे रितेशकडून अनुश्रीला चांगलाच ओरडा खावा लागला होता. परंतु तरीही अनुश्री खेळात स्ट्राँग होती. ती प्रत्येक टास्कमध्ये चांगला खेळ खेळायची. याशिवाय जिथे तिला पटायचं नाही तिथे ती बिनधास्त बोलायची. अनुश्रीची घरात विशालसोबत चांगली मैत्री होती. त्यामुळे अनुश्री बाहेर गेल्याने विशालला चांगलाच वाईट वाटलं आहे.
अनुश्रीच्या चाहत्यांनाही यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. अनुश्रीचं रितेशने मंचावर आनंदाने स्वागत केलं. याशिवाय उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करुन अनुश्रीचं कौतुक केलं. ''हा गेम आहे. पुढे अजून काहीतरी करेन त्यात यश मिळवेन'', अशा भावना अनुश्रीने व्यक्त केल्या.
'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला स्टेजवर आजपर्यंत घराबाहेर गेलेले इतर स्पर्धक दिसत आहेत. या स्पर्धकांमध्ये प्राजक्ता शुक्रे, सोनाली राऊत, करण सोनावणे, रुचिता जामदार, संकेत पाठक हे पाच स्पर्धक मात्र गैरहजर दिसत आहेत. या पाच जणांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत आली आहे.