Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
By देवेंद्र जाधव | Updated: April 19, 2026 23:43 IST2026-04-19T23:29:05+5:302026-04-19T23:43:37+5:30
'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. त्यावेळी तन्वीने केलेलं विधान चर्चेत आहे. काय म्हणाली?

आज 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले झाली. या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. 'बिग बॉस मराठी ६' ची विनर म्हणून तन्वी कोलतेचं नाव घोषित करण्यात आलं.

शेवटच्या क्षणी टॉप २ म्हणून राकेश बापट आणि तन्वी कोलते मंचावर होते. त्यावेळी रितेश देशमुखने तन्वी कोलतेचं विजेती म्हणून नाव घोषित केलं. घराबाहेर जाताना तन्वीने एक महत्वाचं विधान केलं जे चर्चेत आहेे.

जेव्हा लाईट्स ऑफ करायची वेळ आली तेव्हा तन्वी आणि राकेशने एकमेकांचा हात हातात घेतला होता. तेव्हा तन्वीने मनातील भावना व्यक्त केल्या. तन्वीने एका वाक्यात तिच्या सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली.

तन्वीने अत्यंत आत्मविश्वासाने मनातली एक गोष्ट सर्वांना सांगितली. ती म्हणाली, ''मी घरात आले होते तन्वी कोलते म्हणून, पण आता जातेय तन्वी कोलते ब्रँड म्हणून...'', अशाप्रकारे तन्वीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

तन्वी जे बोलली ते खऱ्या अर्थाने तिने पूर्ण करुन दाखवलं. सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेली तन्वी हिरोईन होण्याचं स्वप्न घेऊन आली होती. आता तन्वीने तिच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर 'बिग बॉस मराठी ६'चं विजेतेपद पटकावलं

तन्वी कोलतेला या खास प्रसंगी रितेश देशमुखने खास गिफ्ट दिलं. रितेशने आगामी 'राजा शिवाजी' सिनेमाच्या टीमकडून तन्वीला छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम दिली.

याशिवाय तन्वीला विजयी रक्कम मिळून कलर्स मराठीकडून १५ लाख रुपये मिळाले. याशिवाय डायमंड दागिने खरेदी करण्यासाठी तन्वीला १० लाखांचं गिफ्ट वाऊचरही मिळालं आहे.

















