Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 21:11 IST2026-04-19T21:07:11+5:302026-04-19T21:11:06+5:30

IAS Sanjeev Jaiswal Mhada News: गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगर १, २ आणि ३ पुनर्विकास प्रकल्पाच्या सादरीकरणावेळी एक रहिवाशी त्याची मागणी मांडत असतानाच म्हाडाचे उपाध्यक्ष असलेले आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दमबाजी करत धमकी दिली. त्यांच्या रहिवाशाला धमकी देतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Video: "If the intruder doesn't leave, I will pick you up from here", MHADA Vice President IAS Sanjeev Jaiswal threatens resident; Video goes viral | Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल

Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल

"तुम्ही घुसखोर आहात की आणखी कोणी, हे मला शोधायला भाग पाडू नका. त्याचे ओळखपत्र घ्या. पोलिसांनी जावं आणि त्यांचे ओळखपत्र घ्यावं. गुपचूप ओळखपत्र दे", असे म्हणत म्हाडाचे उपाध्यक्ष आयएएस संजीव जयस्वाल यांनी पुनर्विकासाच्या बैठकीला आलेल्या एका नागरिकाला सर्वांसमोरच धमकावले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांबरोबरच लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ आणि ३ येथील इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील सादरीकरण बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काही नागरिकांकडून त्यांच्या मागण्या मांडण्यात येत होत्या. यावेळी एक मुस्लीम व्यक्ती कार्ड घेऊन उभी राहिली २४०० चौरस फुटाचे घर मिळाले अशी त्याची मागणी होती. 

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल म्हणाले, 'तू घुसखोर निघाला ना, तर उचलून नेईन'

सादरीकरण सुरू असताना हा व्यक्ती कार्ड घेऊन उभा होता. त्याला संजीव जयस्वाल म्हणाले की, "तुम्हाला खरंच मराठी येत नाही का?" तो व्यक्ती नाही म्हणाला. त्यानंतर जयस्वाल म्हणाले की, "बसा खाली. तुम्ही घुखखोर आहात की दुसरे कोणी, हे शोधण्यास मला भाग पाडू नका. समजलं? त्याचे ओळखपत्र काढून घ्या."

त्यानंतर जयस्वाल म्हणाले, "पोलिसांनी जावं आणि त्या माणसाचं ओळखपत्र घ्यावं. ओळखपत्र घेऊन ये. ओळखपत्र दे, गुप गुमाने ओळखपत्र दे. ओळखपत्र दे, मी जरा तपासणी करतो. कोठून आला, कधी आला, कोणत्या वर्षी आला, इथे जन्म झाला की, काय झाले; या सगळ्याची माहिती घेतो ना. तुझ्याबद्दल सगळी माहिती घेतो."

"असं बोलायचं नाही, ओरडून बोलायचं नाही" 
  
"तू जर घुसखोर निघाला ना, तर मग तुला इथूनच उचलून घेऊन जाईन. असं बोलायचं नाही. ओरडू नको", अशी दमबाजी केल्यानंतर संजीव जयस्वाल म्हणाले की, "तुमची संवाद करण्याची काही इच्छा नाहीये. तुमची पुनर्वसनासाठी इच्छा नाहीये. तर ही सभा मी इथे संपवतोय", असे म्हणून त्यांनी बैठक संपवली. 

 

संजीव जयस्वाल यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर टीका होऊ लागली आहे.   सीए संजय परमार यांनी यावर टीका केली. ते म्हणाले  की, "शांततेने आपल्या हक्कांची मागणी करणं हा गुन्हा आहे का? मोतीलाल नगर रहिवाशांचा आवाज हा गुन्हा आहे का? मोतीलाल नगर हे केवळ एक प्रकल्प नाही — हे हजारो कुटुंबांचं घर, इतिहास आणि आयुष्य आहे.५० वर्षांपेक्षा जास्त काळ येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भविष्यासंदर्भात विश्वासात का घेतलं जात नाही?", असे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title : म्हाडा उपाध्यक्ष ने निवासी को धमकाया: "उठा ले जाऊंगा", वीडियो वायरल।

Web Summary : म्हाडा उपाध्यक्ष आईएएस संजीव जायसवाल ने पुनर्विकास बैठक में एक निवासी को धमकाया, जिससे आक्रोश फैल गया। उन्होंने निवासी पर घुसपैठिया होने का आरोप लगाया और उसे हटाने की धमकी दी। वीडियो में कैद इस घटना की राजनीतिक नेताओं और जनता ने निंदा की है।

Web Title : MHADA VP threatens resident: "I'll take you away," video viral.

Web Summary : MHADA Vice President IAS Sanjeev Jaiswal threatened a resident during a redevelopment meeting, sparking outrage. He accused the resident of being an infiltrator and threatened to have him removed. The incident, captured on video, has drawn condemnation from political leaders and the public.