भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल IPL मधील कामगिरीपैक्षा फिल्डबाहेरील वैयक्तिक गोष्टीमुळे अधिक चर्चेत आहे. अभिनेत्री आणि मॉडेल तानिया चटर्जी हिने क्रिकेटचे चॅट सार्वजनिक करत खळबळजनक दावा केल्याची गोष्ट चांगलीच गाजत आहे. फ्लर्टच्या मुद्यावरून आता पजांब किंग्सच्या ताफ्यातील अर्शदीप सिंग आणि मुशीर खान यांनी फ्लाईटमध्येच चहलची फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फ्लाइटमध्ये अर्शदीप सिंगची "क्यूट-क्यूट... बोलंदाजी"
पंजाब किंग्सचा संघ वानखेडेच्या मैदानातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मैदानातील दिमाखदार विजयानंतर रविवारी घरच्या मैदानात लखनौ विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याआधी पंजाबच्या ताफ्यातील खेळाडूंचा फ्लाईटमधील मजेशीर किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अर्शदीप सिंगच्या हातात माईक आल्यावर "अच्छा क्युट से याद आया की..." असे म्हणत अर्शदीप सिंग प्रियांश आर्यच्या खांद्यावरुन चहलवर निशाणा साधताना दिसले. ही गोष्ट चहलनेही हसण्यावारी घेतली.
कोण आहे Taniya Chatterjee? 'गंदी बात' फेम अभिनेत्रीनं चहलसंदर्भात केला आणखी एक दावा, म्हणाली...
काय आहे क्युटची भानगड?
अभिनेत्री आणि मॉडेल तानिया चटर्जी हिने चहलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून क्युट आहेस असा मेसेज पाठवल्याचा दावा केला होता. तिने चहलच्या पर्सनल मेसेज जगजाहिर केल्याचा मुद्दा चर्चेत असताना अर्शदीपनं फ्लाईटमध्ये फ्लर्टिंगचा मुद्दा आपल्या अंदाजात पुन्हा चर्चेत आणला आहे.
क्रिकेटनं अभिनेत्रीविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
फ्लाईटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट चहलनं हसण्यावारी घेतली असली तरी या प्रकरणात युझवेंद्र चहलनं तानिया चॅटर्जी विरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याची माहितीही समोर आली आहे. अभिनेत्रीने बदनामी केल्याचे सांगत तिने केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे क्रिकेटरने म्हटले आहे.
कोण आहे तानिया चटर्जी?
तानिया चटर्जी कोलकाताची रहिवाशी असून ती पेशाने मॉडल आणि अभिनेत्री आहे, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेगवेगळ्या सीरिजच्या माध्यमातून तिने आपली ओळख निर्माण केली आहे. 'गंदी बात सीजन ४', 'जाल' आणि 'कसक' यासारख्या सीरिजमधून तिने आपल्या बोल्डनेसनं सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते.