कोण आहे Taniya Chatterjee? 'गंदी बात' फेम अभिनेत्रीनं चहलसंदर्भात केला आणखी एक दावा, म्हणाली...

कोण आहे ही अभिनेत्री? नेमकं काय आहे चहलसंदर्भात गाजत असलेले फिल्डबाहेरील नवे प्रकरण? जाणून घेऊया सविस्तर

IPL मध्ये पंजाब किंग्सच्या ताफ्यातून खेळत असलेल्या क्रिकेटर युझवेंद्र चहल पुन्हा एकदा फिल्डबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

'गंदी बात' फेम अभिनेत्री तानिया चटर्जी हिने क्रिकेटर युझवेंद्र चहलनं इन्स्टाच्या माध्यमातून मेसेज पाठवल्याचा दावा केला आहे. तिने त्याचा पुरावाही दाखवला अन् सोशल मीडियावर तिने शेअर केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.

आता या अभिनेत्रीने दावा केलाय की, चहलसंदर्भातील जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो हटवण्यासाठी क्रिकेटरची पीआर टीम दबाव टाकत आहे. कोण आहे ही अभिनेत्री? नेमकं काय आहे चहलसंदर्भातील प्रकरण? जाणून घेऊया सविस्तर

अभिनेत्री तानिया चटर्जीने कॅमेरासमोर क्रिकेटरने पाठवलेल्या मॅसेज दाखवत म्हणाली होती की, "तू क्यूट आहेस… पाहा, हा मेसेज युझवेंद्र चहलनं पाठवला आहे. त्याने मला क्यूट म्हटलं आहे."

अभिनेत्री तानिया चटर्जी हिने पापाराझीसमोरही युझवेंद्र चहलने पाठवलेला प्रायव्हेट मेसेज दाखवत क्रिकेटरसंदर्भातील चॅटिंगची गोष्ट शेअर केली. आता तिने व्हायरल व्हिडिओ हटवण्यासाठी चहलच्या पीआर टीमने मेसेज पाठवल्याचा दावा केला आहे.

इंडिया फोरम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, चहलला यासंदर्भात काही बोलायचं असेल तर तो थेट बोलू शकतो. जे मेसेज दाखवले त्यात क्रिकेटरनं माझं कौतुक केलं आहे. त्यात काहीच गैर नाही. मी कोणताही पब्लिसिटी स्टंट करत नाही, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.

कोलकाताची रहिवाशी असलेल्या तानिया चटर्जी एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल आणि सोशल मीडिया इन्फुएन्सरच्या रुपात ओळखला जाणारा चेहरा आहे.

तिने अनेक बोल्ड ओटीटी प्रोजेक्टमध्ये काम केले असून गंदी बात सीझन ४ मध्येही ती दिसली आहे.