होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 21:04 IST2026-04-14T21:00:27+5:302026-04-14T21:04:10+5:30

PM Modi Donald Trump Call: इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली. त्यानंतर पुन्हा एकदा आखातामध्ये तणाव वाढला आहे. दरम्यान, तणावाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. 

Tensions with Iran rise over Hormuz! PM Modi and Donald Trump hold 40-minute talks | होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा

होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा

PM Modi Donald Trump Talk: इस्लामाबादमधील इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा फिस्कटल्यानंतर आखाती देशांमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेने थेट इराणच्या बंदरांचीच नाकेबंदी सुरू केली. तर आता इराणही आक्रमक पवित्र्यात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. ४० मिनिटे दोन्ही नेत्यांनी युद्ध परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

इराण आणि अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांची पहिलीच चर्चा झाली. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीची पूर्णपणे नाकेबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर ही घडामोड घडली आहे. 

मोदी-ट्रम्प कोणत्या मुद्द्यांवर बोलले?

अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प पंतप्रधान मोदींना म्हणाले की, भारत अमेरिकेचा प्रिय मित्र आहे. द्विपक्षीय सहकार्यावर वाढवण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावरही चर्चा झाली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली असावी आणि त्यातून जहाजांना सुरक्षितपणे वाहतूक करता यायला हवी, या मुद्द्यावर मोदींनी भर दिला. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला ट्रम्प यांचा कॉल आला होता"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबद्दल 'एक्स'वर माहिती दिली. मोदी म्हणाले, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला कॉल आला होता. आम्ही दोन्ही देशांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील कामांचा आढावा घेतला. आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक जागतिक सहकार्य वाढवण्यावर जोर दिला. आम्ही पश्चिम आशियामधील परिस्थितीवरही चर्चा केली आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित असायला हवी, यावर जोर दिला."

Web Title : होर्मुज तनाव: मोदी और ट्रम्प ने ईरान की स्थिति पर 40 मिनट चर्चा की

Web Summary : ईरान के साथ बढ़ते तनाव के बीच, पीएम मोदी और राष्ट्रपति ट्रम्प ने 40 मिनट तक स्थिति पर चर्चा की। उन्होंने द्विपक्षीय सहयोग और होर्मुज जलडमरूमध्य को खुला और सुरक्षित रखने के महत्व पर जोर दिया। नेताओं ने व्यापक वैश्विक सहयोग पर ध्यान केंद्रित करते हुए चल रहे सहयोग की समीक्षा की।

Web Title : Hormuz Tension: Modi and Trump Discuss Iran Situation for 40 Minutes

Web Summary : Amid rising tensions with Iran, PM Modi and President Trump discussed the situation for 40 minutes. They emphasized bilateral cooperation and the importance of Hormuz Strait remaining open and safe for navigation. The leaders reviewed ongoing collaborations, focusing on broader global cooperation.