IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच

कोलकाता नाईट रायडर्सची विजयाची पाटी पाच सामन्यानंतरही कोरीच राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 23:48 IST2026-04-14T23:41:15+5:302026-04-14T23:48:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs KKR Noor Ahmed took three wickets as Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच

IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच

IPL 2026: KKR's Winless Run In IPL 2026 Continues, Slumps To 32-Run Loss Against CSK :  चेन्नईच्या चेपॉकच्या घरच्या मैदानात नूर अहमदच्या फिरकीतील जादू आणि पॉवर प्लेमध्ये अंशुल कंबोज आणि खलील अहमद यांच्या गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सवर पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढावली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

CSK कडून चुकांवर चुका; पण KKR ला त्याचा फायदाच उचलता आला नाही   

१९३ धावांचा बचाव करताना चेन्नई सुपर किंग्सने क्षेत्ररक्षणात काही मोठ्या चुका केल्या. चौथ्या षटकात ऋतुराज गायकवाडनं सुनील नरेनचा सोपा झेल सोडला. ब्रेविसनं आठव्या षटकात अंगकृष रंघवंशीला जीवनदान दिले. १० व्या षटकात सरफराज खान याने अजिंक्य रहाणेचा झेल सोडून यात भर घातली. पण या तिघांतील एकालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे चुकांवर चुका करूनही शेवटी चेन्नई सुपर किंग्सने विजयाचा डाव साधला.  २०२४ नंतर पहिल्यांदाच चेन्नईनं IPL मध्ये सलग दोन विजय नोंदवले आहेत. कोलकाताचा संघ पाच सामन्यानंतरही यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.  

CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला

पॉवर प्लेमध्ये CSK च्या गोलंदाजांची हवा, KKR चा सलामीचा नवा प्रयोग फसला 

पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने संजू सॅमसन ४८ (३२), आयुष म्हात्रे ३८ (१७) आणि डेवॉल्ड ब्रेविसच्या ४१ (२९) खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ बाद १९२ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट  रायडर्सच्या संघाकडून सलामीचा नवा प्रयोग पाहायला मिळाले.  फिन ॲलन आणि सुनील नरेन यांनी डावाची सुरुवात केली. अंशुल कंबोज याने दुसऱ्याच षटकात १३ धावांवर  फिन ॲलनच्या रुपात कोलकाताच्या संघाला पहिला धक्का दिला. तो फक्त एक धाव करून तंबू परतला.  सुनील नरेन याने २ चौकार आणि २ षटकारांसह सलामीचा प्रयोग यशस्वी ठरवण्याचे संकेत दिले. पण खलील अहमदनं २४ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लावला. पॉवर प्लेमध्येच दोन्ही सलामीवीरांनी विकेट गमावल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने सामन्यावर पकड मिळवली.

नूरनं आपल्या फिरकीच्या जोरावर चेन्नईच्या बाजूनं सेट केला सामना

 अकिल होसीन याने अंगकृष रघुवंशीला २७ (१९) रोखल्यावर नूर अहमद पिक्चरमध्ये आला. त्याने अजिंक्य रहाणेला २८ धावांवर आपल्या जाळ्यात अडकवले.  याशिवाय त्याने रिंकू सिंह आणि कॅमरून ग्रीनची विकेट घेतली. त्याची ही कामगिरी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. अखेरच्या षटकात कोलकाताच्या संघाकडून रोव्हमन पॉवेल याने २२ चेंडूत नाबाद ३१ धावांची खेळी केली. रमनदीप सिंगनेही २३ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. पण त्यांची ही खेळी संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही. कोलकाताचा संघ निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ३२ धावांनी सामना खिशात घातला.

Web Title : आईपीएल 2026: गलतियों के बावजूद सीएसके की जीत; केकेआर अभी भी जीत से वंचित

Web Summary : सीएसके ने फील्डिंग में गलतियों के बावजूद अपना दूसरा आईपीएल 2026 जीत दर्ज की। केकेआर की हार का सिलसिला 32 रन से हार के बाद भी जारी रहा। नूर अहमद, अंशुल कंबोज और खलील अहमद की शानदार गेंदबाजी ने सीएसके को अपने स्कोर का बचाव करने में मदद की। केकेआर का संघर्ष जारी है, पांच मैचों के बाद भी जीत से वंचित है।

Web Title : IPL 2026: CSK Wins Despite Errors; KKR Still Winless

Web Summary : CSK secured its second IPL 2026 victory despite fielding errors. KKR's losing streak continued after suffering a 32-run defeat. Excellent bowling from Noor Ahmad, Anshul Kamboj, and Khaleel Ahmed helped CSK defend their score. KKR's struggles continue, remaining winless after five games.