१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 00:37 IST2026-04-15T00:34:24+5:302026-04-15T00:37:27+5:30
Amravati Crime: अमरावती जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी १८ व्हिडिओ, ३९ फोटो जप्त केले असून, ८ पीडित तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे.

१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
Amravati Crime News: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली. सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तपासात जे समोर आले, त्याने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. यातील एका आरोपीने केवळ एक-दोन नव्हे, तर तब्बल १८ अश्लील व्हिडिओ आणि ३९ आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
विकृतीचा कळस: ८ पीडितांची ओळख पटली
मिळालेल्या माहितीनुसार, अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याने परिसरातील मुलींशी शारीरिक जवळीक साधून अश्लील व्हिडीओ बनवले. तर दुसरा आरोपी उजेर खान इकबाल खान (२०. परतवाडा) याने ते सोशल मीडियावर व्हायरल केले.
प्राथमिक तपासानुसार, आतापर्यंत ८ पीडित मुलींची ओळख पटली असून, हा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. अयानच्या मोबाईलमधून उजेर खान इकबाल खान (२०, रा. अचलपूर) याने सर्वप्रथम हे व्हिडिओ viral केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीस कोठडी आणि सखोल तपास
अयान अहमद याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्यातील डेटावरून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी किती खोलवर पसरले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
पीडितांना आवाहन: तुमची ओळख गुप्त राहील!
या प्रकरणातील गांभीर्य ओळखून पोलिसांनी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. अनेकदा भीतीपोटी तक्रार दिली जात नाही, हे ओळखून पोलीस प्रशासनाने महिला अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
स.पो.नि. प्रियंका भोयर (महिला सहायता कक्ष): ८४८४९५७८२७
पो.उप.नि. स्नेहल आडे (पो.स्टे. परतवाडा): ९०९६०२६४२४
संध्या भालेराव (सखी वन स्टॉप सेंटर): ९०२१९३५०१५
पोलिसांनी दिला इशारा
हा गुन्हा 'पोक्सो' कायद्यांतर्गत दाखल आहे. सोशल मीडियावर पीडितांची ओळख पटेल असे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवा पसरवू नका आणि तपासात सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे.